नितीन गडकरी म्हणाले, ‘…मी सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला होता’, वाचा संपूर्ण किस्सा

नवी दिल्ली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कामामुळे कायम चर्चेत असतात. मात्र सध्या ते एका खाजगी किस्सा सांगितल्यामुळे चर्चेचे आले आहेत. नितीन गडकरी यांनी आज दिल्ली-मुंबई ग्रीन एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी केली.

नितीन गडकरी यांनी सकाळी हरियाणामध्ये पाहणी केल्यानंतर राजस्थानमध्ये महामार्गाच्या कामाची पाहणी गडकरींनी केली. या प्रकल्पामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर १२ तासात पूर्ण करता येणार आहे. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून महामार्ग जाणार आहे.

त्यावेळी त्यांनी गुरुग्राममधील सोहना येथे झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी संबोधित केले आहे. आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी एक खाजगी आयुष्यातील मोठा किस्सा सर्वांसोबत शेअर केला आहे. जो त्यांच्या पत्नीलादेखील माहीत नव्हता.

नितीन गडकरी म्हणाले की, ‘माझं नुकतंच लग्न झालं होतं, तेव्हा रामटेकमध्ये रस्ते बांधकाम सुरु होतं, आणि माझ्या सासऱ्यांचं घर रस्त्याच्या मधोमध येत होतं. यावेळी पत्नीला कोणतीही कल्पना न देता सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, तो रस्ता पूर्ण केला’, असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी यावेळी केला.

यावेळी त्यांनी केंद्रातील सहकारी राव इंद्रजीत सिंग यांचे आभार मानले. इंद्रजीत सिंग यांनीही एक्स्प्रेस वेमध्ये येत असलेल्या आपल्या सासरचं घर खाली करण्यास सांगितलं, ही भूमिका घेतल्याबद्दल नितीन गडकरी यांनी इंद्रजीत सिंग यांचे धन्यवाद मानले. नेत्याने अतिक्रमण वाचवण्याचं पाप करु नये, असं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

पुढे गडकरी म्हणाले की, आमच्या मंत्रालयाचे बजेट एक लाख कोटी रुपयांचे आहे, परंतु आम्ही १५ लाख कोटींचा रस्ता बनवत आहोत. जर आम्ही इन्व्हेस्टर्सकडून पैसे घेतो तर त्यांना परतही करावे लागतात. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे वर गुरुग्रामच्या जवळपास दोन-तीन स्मार्ट सिटी बनवता येऊ शकतात.

कोणत्याही देशाचे रस्ते चांगले असणे आवश्यक आहे. धौलाकुआं जवळ एक पोलीस स्टेशन आहे, ते हटवून सुद्धा रस्ता रूंद करता येऊ शकतो. सध्या १४५० किमी अंतर कापावं लागतं पण एक्सप्रेस-वे झाल्यानंतर हे अंतर १२५० किमी होणार आहे. त्यामुळे सध्या २४ तासांचा वेळ लागणारा हा प्रवास एक्सप्रेस वे मुळे १२ तासांवर येईल असं सांगितलं जातं आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.