Share

नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार? जाहीर कार्यक्रमात म्हणाले, पुष्कळ झालं, आता…

nitin gadkri

नितीन गडकरी : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतल्यावर भाष्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात सांगितले की, त्यांना सामाजिक कार्यात खूप रस आहे आणि अनेकवेळा निवडून आलो आहे. त्यामुळे आता पटलं तर मत द्या नाहीतर देऊ नका. मी आता जास्त मस्का मारत बसणार नाही असे नितीन गडकरींनी म्हटले आहे.

त्यामुळे केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी सक्रिय राजकारणातून पुर्णपणे निवृत्त होणार की लोकसभा निवडणूक न लढवता राज्यसभेवर जाणार? याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे बिनधास्त विधान केले आहे. काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात राजकारणातून बाजूला होण्याचे संकेत दिले होते.

पद्मविभूषण शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोहन धारिया नेशन बिल्डिंग पुरस्काराने सन्मानित केले. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी सामाजिक कार्यात जास्त रस असल्याचे सांगितले आहे. पटलं तर मत द्या नाहीतर देऊ नका असेही नितीन गडकरी म्हणाले.

“मी लोकांनाही सांगितले की पुष्कळ झाले आता, मी पण निवडून आलो. तुम्हाला पटले तर मत द्या, नाहीतर नका देऊ. मी आता फार लोणी लावायला तयार नाही. खरे म्हणजे मलाही आता राजकारणापेक्षा समाजकारणाच्या या कामाला जास्त वेळ द्यायचा आहे,” असे नितीन गडकरी यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

नापीक जमिनीवर बांबू लावला तर 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकते. त्यातून पर्यावरण रक्षणाबरोबरच रोजगारही निर्माण होऊ शकतो. आपल्या लोकांना त्याचे फायदे कळत नाहीत. मुख्य प्रवाहातील लोकांना पर्यावरण,जलसंवर्धनाचे महत्त्व कळत नाही.

मुख्य प्रवाहातील लोकांमध्ये या बाबींना प्राधान्य द्यायला हवे. हवामान बदल हा विषय मोजक्या लोकांचा आहे, असेही गडकरी म्हणाले. “जलसंधारण, हवामान बदल आणि पडीक जमिनींचा योग्य वापर यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रयोगांना भरपूर वाव आहे आणि आम्ही त्या क्षेत्रांमध्ये कठोर परिश्रम घेत आहोत.

मी प्रेमाने नाहीतर ठोकून काम करतो. भविष्यात या क्षेत्रात जोमाने काम करण्याची माझी अपेक्षा आहे. कारण यामुळे केवळ भारताची अर्थव्यवस्थाच नाही तर ग्रामीण भागाचा चेहरामोहराही बदलू शकते, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या
उर्फी जावेद ही मुलगी नसून किन्नर आहे, अभिनेत्याचा दावा, पुरावेही देण्यास तयार
तुमची ५२ काय १५२ कुळं खाली आली तरी ठाकरेंपासून शिवसेनेला कुणीही तोडू शकत नाही
‘या’ दिवसापासून बंद होणार देशातील सर्व टोलनाके! नितीन गडकरींनी सांगीतला जबरदस्त प्लन

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now