पेट्रोल-डिझेल पंप कायमचे हद्दपार व्हावेत; हिच माझी इच्छा – नितीन गडकरी

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या किंमतीत उच्चांक गाठला आहे. काही शहरात तर किंमती १०० रुपयांहून जास्त झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य लोक नाराज झालेले असून अनेकजण त्यांच्यावर टीका करताना दिसून येत आहे.

पेट्रोल डिझेलच्या पर्यायी व्यवस्थावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा पर्याय सुचवले आहे. आता नागपूर येथे त्यांनी पेट्रोल-डिझेल संदर्भातील प्रश्नांवर उत्तरे दिली आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या मनातील इच्छाही सर्वांसमोर बोलून दाखवली आहे.

माझी इच्छा आहे की देशातून पेट्रोल डिझेल पंप हद्दपार व्हावेत असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मल्टिमॉडल लॉजेस्टिक पार्क सिंदी रेल्वे वर्धासाठी सामंजस्य करार कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी आपली ही इच्छ बोलून दाखवली आहे.

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट यांच्यामध्ये हा सामंजस्य करार होत आहे. हा गुड लॉजिस्टिक व पॅसेंजर लॉजिस्टिक हब बनवला जात आहे. त्यामुळे या विशेष कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्यासोबतच पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस आणि आमदार डॉक्टर पंकज भोयर ह्यांच्या उपस्थितीत पार पडला आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कार्यक्रमात अनेकदा पेट्रोल डिझेलला पर्याय दिला आहे. इथेनॉल, मिथेनॉल हे पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात. उसाचे साल, कॉटन, मका व तांदुळ यांपासून इथेनॉल बनवता येते, असा पर्याय नितीन गडकरी यांनी सुचवला होता.

तसेच नितीन गडकरी इलेट्रॉनिक गाड्या वाढवण्यावरही भर देताना दिसून येत आहे. नितीन गडकरी यांनी अनेकदा आपल्या भाषणात इलेट्रॉनिक गाड्यांचा उल्लेख केला आहे. पण भारतातून अजूनही इलेट्रॉनिक गाड्यांचे प्रमाण कमी आहे. कारण इलेक्ट्रॉनिक गाड्या वापरताना चार्जिंगची अडचण येऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-
शाहरूख खान म्हणजे चांगल्या वर्तन कसे असावे याचे आदर्श उदाहरण; अभिनेत्रीचे वक्तव्य
समीर वानखेडेंच्या विरोधात बोलू नका अन्यथा..;नवाब मलिकांना जीवे मारण्याची धमकी
एकेकाळी ८६ किलो वजन आणि ३८ इंच कंबर असलेल्या परिणीती चोप्राने स्वतःला अशाप्रकारे फॅटपासून फिट बनवले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.