Share

‘आता गरिबांच्या पैशातून रस्त्यांची निर्मिती करणार’, नितीन गडकरींनी सांगितली योजना

nitin gadkari

भारतामध्ये(India) सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. देशातील मोठी शहरे महामार्गाने एकमेकांशी जोडली जात आहेत. दररोज ३८ किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. हा एक विक्रम आहे. देशातील काही ठिकाणी प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून देखील रस्त्याच्या निर्मितीचे प्रयोग केले जात आहेत.(nitin gadkari new scheme Roads will be built with the money of the poor)

आता देशातील रस्ते तयार करण्यासाठी सामान्य किंवा गरीब जनतेचे पैसे वापरण्यात येणार आहेत. केंद्र सरकराने यासंदर्भात एक नियोजन प्रक्रिया आखली आहे. या प्रक्रियेनुसार देशातील शिपाई, सरकारी कर्मचारी, अधिकारी व इतर नोकरदार वर्गांचे पैसे रस्त्यांच्या निर्मितीसाठी गुंतवले जाणार आहेत. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत लोकसभेत घोषणा केली आहे.

यावेळी परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, “डिसेंबर २०२४ च्या आधी भारतातील रस्ते अमेरिकेप्रमाणे असणार आहेत. रस्त्यांच्या निर्मितीमुळे देशाच्या विकासाची गतीही वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची निर्मिती झाल्यास प्रत्येक वर्गाचं आयुष्य सोपं झालं आहे”, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

लोकसभेत २०२२-२३ या वर्षासाठी रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या मागणीवर चर्चा करण्यात आली होती. यावेळी परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “आता दिल्लीपासून मेरठला जाण्यासाठी फक्त ४० मिनिटं लागत आहेत. आमचं ध्येय रस्ते निर्मितीमधील गुंतवणूक कमी करून गुणवत्ता वाढवणे आहे.”

परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, “आम्ही सध्या एका प्रोजेक्ट इनविट म्हणजेच इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट वर काम करत आहोत. ज्यामध्ये गरीब लोकांच्या पैशांचा वापर होईल आणि याबदल्यात त्यांना चांगलं व्याज देण्यात येईल. ही एक प्रकारची गुंतवणूक प्रक्रिया असणार आहे.”

“या प्रोजेक्ट इनविटमध्ये गरीब जनतेच्या पैशांचा वापर करण्यात येणार आहे. याचा अर्थ असा नाही की सरकारकडे पैसा नाही. आपल्याकडे पैशांची कमतरता नाही. तुम्ही जितके रस्ते मागाल तितके मी बांधीन. पैसे मार्केटमधून उचलण्यात येतील. अनेक बँका पैसे देण्यासाठी उत्सुक आहेत”, असे परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
RRR साठी आलिया भट्ट नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रीला पहिल्यांदा आली होती चित्रपटाची ऑफर
निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि.., गडकरींनी व्यक्त केली इच्छा
कृषी पर्यटनाची गरज शेतकऱ्यांना व पर्यटकांना – गणेश चप्पलवार

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now