नागपूरचे महापौर पडले नितीन गडकरींच्या पाया! पदवीधर निवडणुकीत रंगले नाराजीनाट्य

नागपूर । सध्या पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सर्वच पक्षांनी आता आपले उमेदवार देखील जाहीर केले आहेत. मात्र उमेदवार जाहीर करताना अनेक ठिकाणी नाराजीनाट्य बघायला मिळाले आहे.

या निवडणुकीत भाजपला बंडखोरीचा फटका बसला आहे. नागपूरमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार संदीप जोशी हे सर्वात आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊनच अर्ज भरण्यासाठी रवाना झाले आहे. पदवीधर मतदारसंघासाठी नागपूरमधून महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या निवडणुकीत उमेदवार देताना नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक अनिल सोले यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. पण, अनिल सोले यांचा पत्ता कट करण्यात आला. संदीप जोशी यांना संधी मिळाली. अनिल सोले यांना उमेदवारी न दिल्यामुळे नितीन गडकरी गट नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

अर्ज भरण्याआधी संदीप जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी जोशी यांनी गडकरींच्या पाया पडून आशिर्वाद घेतला. नितीन गडकरींचा आशिर्वाद घेऊन जोशी यांनी भाजपमध्ये कोणतीही नाराजी नाही, असे म्हटले आहे.

या उमेदवार निवडीत गडकरी गटाला उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र यामध्ये त्यांना डावलण्यात आले. यामुळे गडकरी गट नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.