स्वीय सहाय्यकाचा जीव वाचवण्यासाठी गडकरींनी मध्यरात्री उघडले बँकेचे लॉकर; खर्च केले ३५ लाख

कोरोनाने गेल्या वर्षभरापासून राज्यात थैमान घातले आहे. कोरोनामुळे अनेक रूग्णांना जीव गमावावे लागले आहेत. उपचाराअभावी रूग्णांचे हाल होत आहेत. राज्यात लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. कोरोना काळात राजकीय नेते, अभिनेते, उद्योजक गोरगरीबांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी बेधडक बोलण्याच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. विरोधकांना रोखठोक भाषेत उत्तरं देत असतात. नितीन गडकरींनी काही दिवसांपुर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी व्हिटारीस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांना फोन करून नागपुरला चार हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन पाठवण्यासाठी चर्चा केली. त्यानंतर लगेच इंजेक्शन पाठवण्यात आली.

नितीन गडकरी भाषणा दरम्यान नेहमी किस्से सांगत असतात. त्यातील काही किस्से हे मजेशीर असतात. तर काही भावनिक असतात. गडकरींनी असाच एक किस्सा सांगितला आहे. कोरोना काळात स्वीय सहाय्यकाचा जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड त्यांनी सांगितली आहे. सध्या सोशल मिडियावर गडकरींचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गडकरी म्हणाले कोविडच्या काळात एक घटना घडली जेव्हा माझे खाजगी स्वीय्य सहाय्यक मंडलेकर जे नागपुरचं काम पाहतात. त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना विवेका रूग्णालयात भरती करण्यात आले. मी डॉक्टरांना भेटलो असता त्यांनी आता आम्ही हरलो, काही करू शकत नाही असं सांगत हात टेकले. मी त्यांना उपाय विचारला असता त्यांनी चेन्नईमधील एमजीएम रूग्णालय जिथे हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपण होतं तिथे नेल तर काही तरी होऊ शकतं असं सांगितलं.

पण आयसीयुमध्ये आणि ऑक्सिजनवर असल्याने त्यांना न्यायचं कसं हा प्रश्न समोर होता? आमच्याकडे २४ तासांचा वेळ होता. मी घरी आल्यानंतरही चिंतेत होतो. कारण त्यांचे वडील माझ्या मोठ्या भावासारखे होते. माझ्या परिवारातील एक व्यक्ती अशा स्थितीत असल्यामुळे माझ्या मनात अस्वस्थता होती. रात्री झोप लागली नाही. मी घरी आल्यावर स्वीय सहाय्यकांना गोळा केलं आणि एअर अॅम्बुलन्सची सोय करण्यास सांगितलं.

एमजीएम रुग्णालयासोबत चर्चा केली. अमेरिकेतील डॉक्टर मित्र शोधले. मला लगेच एमजीएम रूग्णालयाच्या एमडीचा, तसंच दीपा नावाच्या डॉक्टरांचा फोन आला. ते म्हणाले अॅम्बूलन्सवाला ३५ लाख रूपये अॅडव्हान्स पाहिजे असं सांगत होता. संध्याकाळचे ६ वाजल्याने सगळ्या बँका बंद झाल्या होत्या. माझी बायको एका को ऑपरेटिव्ह बँकेची अध्यक्ष आहे. मी लगेच बँकेच्या सीईओंना फोन करून बोलावलं आणि रात्री लॉकर उघडता येईल का? असं त्यांना विचारलं.

मला लॉकरमधून ३५ लाख दे, मी तुला उद्याच्या उद्या पैसे परत करेन असं म्हटलं. ते पैसे आणले, कसं पाठवायचं हे ठरले. त्या अॅम्बूलन्सवाल्याला पैसे दिले. मशीन घेऊन ते आले आणि पाच डॉक्टरही सोबत होते. एअर लिफ्ट करून चेन्नईला नेलं. तिथं उपचार झाले आणि तो बरा झाला, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं आहे.

गडकरी पुढे म्हणाले, बरा झाल्यानंतर तो माझ्याकडे आला आणि लहान मुलासारखा रडत होता. आपल्या कुटूंबातील एक व्यक्ती मृत्यूला हात लावून परत आला आणि पुन्हा काम करू लागला याचा मला मनस्वी आनंद होता. असं गडकरी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनामुळे पतीचा झाला मृत्यू, धक्का सहन न झाल्याने तीन वर्षाच्या लेकरासह पत्नीची आत्महत्या
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! संचारबंदीत ‘या’ दोन सेवाही अत्यावश्यक सेवेत
“मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस म्हणजे चंद्रकांत पाटील”
कोरोना रूग्ण महिलेची डॉक्टरने घातली वेणी, व्हिडिओ पाहून आयपीएस अधिकारी म्हणतो…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.