एक्सप्रेस हायवे नरिमन पाॅइंटपर्यंत न्हेनार; नितीन गडकरी सुसाट

१७ सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात जाहीर केलं की, “सरकार भरतातील सर्वात लांब महामार्ग म्हणजेच दिल्ली – मुंबई एक्सप्रेस हायवे बांधत आहे.”

पुढे ते म्हणाले, “हा एक्सप्रेस हायवे १ हजार ३८० किमी लांबीचा असेल आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) पर्यंत जाईल. परंतू आम्ही तो नरिमन पॉइंट पर्यंत नेण्याचा विचार करत आहोत.” दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे मार्च 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या बांधकामाचा आढावा घेतला. या दरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, “सुमारे 1 लाख कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारा हा एक्सप्रेस वे देशातील सर्वात लांब असेल.”

एक्सप्रेस वेच्या बाजूने 20 लाख झाडे लावली जातील ज्यामुळे पर्यावरणाला फायदा होईल. तसेच दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येपासून सुटका होईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितल आहे. एक्सप्रेस वेच्या बांधकामामुळे दिल्ली आणि मुंबईमधील अंतर कमी होईल.

प्रवासाची वेळ 24 तासांवरून 11 तासांवर येईल. तसेच या एक्सप्रेस वे वर बस आणि ट्रक सारखी अवजड वाहने सुद्धा 120 किमी प्रतितास वेगाने धावू शकतील. तसेच दरवर्षी 32 कोटी लिटर इंधनाची बचत होईल.

गडकरी म्हणाले की, “हा एक्सप्रेस वे राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आदिवासी जिल्ह्यांमधून जात आहे. त्यामुळे, या भागांचा विकास होईल. त्याचसोबत, येथील लोकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.”

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या एक्सप्रेस वे गती चाचणी घेतली. गडकरींनी प्रथम हेलिकॉप्टरने दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेची पाहणी केली आणि नंतर स्वतः कारमध्ये बसून त्यांनी टेस्ट ड्राइव्ह चाचणी केली. या दरम्यान त्यांची कार 170 किलोमीटर प्रति तास वेगाने धावली. गडकरींच्या स्पीड टेस्टचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

 

महत्वाच्या बातम्या
“माजी गृहमंत्री फरार’; हे देशातच नाही तर जगात पहील्यांदा घडतय”
साताऱ्याचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाखमध्ये आले वीरमरण; १० महिन्यांची चिमुरडी झाली पोरकी
निलेश राणेंची संजय राऊतांवर जहरी टीका, म्हणाले, ‘तु जिथे गेलास तिथे शिवसेनेचं तोंड काळं झालं’
मोठी बातमी! परमबीर सिंह बेपत्ता, नेपाळमार्गे लंडनला पळाल्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.