मोठी बातमी! नितीन देसाई यांच्या स्टुडिओला भीषण आग

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या स्टुडिओला भीषण आग लागली आहे. कर्जतमध्ये एका शुटींगसाठी एक सेट तयार करण्यात आला होता. त्याच सेटला आता भीषण आग ल्यागल्याची माहिती मिळत आहे.

माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहे. दुपारी अडीचच्या सुमारास ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते, अशी माहिती आहे.

रायगडमधील कर्जत येथे असणाऱ्या एनडी स्टुडिओच्या भव्य दिव्य आवारात फिल्मी दुनिया हे थीम पार्क आहे. या ठिकाणी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांचे सेट आहे. मात्र आता लागलेली ही आग एका नवीन मालिकेच्या सेटला लागलेली आहे.

घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचल्याअसून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच ही आग सेटला कशामुळे लागली आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अशात वणव्याच्या आगीमुळे सेटला ही आग लागल्याचे म्हटले जात आहे.

ही आग इतकी भीषण होती, की या आगीत शुटींगसाठी तयार करण्यात आलेला पुर्ण सेट जळून खाक झाला आहे. तसेच यामुळे दुरवरुनही धुराचे लोट दिसत होते. या आगीच जोधा अकबर चित्रपटासाठी तयार करण्यात आलेला सेटही थोड्या प्रमाणात जळाला आहे.

दरम्यान, या स्टुडिओच्या मागे मोठे जंगल आहे. त्या जंगलात वणवा पेटल्याने ही आग लगल्याचे म्हटले जात आहे. ही आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. पण या आगीत आतापर्यंत किती नुकसान झाले आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

दुःखद! भारताच्या धडाकेबाज क्रिकेटपटूवर दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचा कोरोनाने मृत्यू
‘त्या’ दिवसापासून शिवसेनेचे कट्टर समर्थक नारायण राणे शिवसेनेचे कट्टर विरोधक बनले
सुंदरतेसोबतच व्यवसायामध्ये देखील खुप पुढे आहे सुनील शेट्टीची पत्नी; वर्षाला कमवते करोडो रुपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.