भिडे गुरूजींचे निकटवर्तीय नितीन चौगुलेंच शिवप्रतिष्ठानमधून निलंबन

महाराष्ट्र राज्यातील मोठी हिंदुत्ववादी संघटना शिवप्रतिष्ठान आता पुन्हा चर्चेत आली आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांना संघटनेतून निलंबित करण्यात आले आहे. शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांनी ही कारवाई केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून नितीन चौगुले यांच्याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं असल्याचं शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सांगितलं आहे. नितीन चौगुले गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रतिष्ठानमध्ये काम करत आहेत. संभाजी भिडे गुरूजी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जाते.

दरम्यान नितीन चौगुले यांच्यावर संघटनेतून निलंबणाची कारवाई झाल्याचं समजताच त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष भिडे गुरूजी यांच्याकडे निलंबन मागे घेण्याची विनंती केली पण भिडे गुरूजींनी ठाम भुमिका घेत कारवाई मागे घेणार नसल्याचं सांगितलं आहे.

संघटनेच्या वतीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की, “नितीन चौगुले यांना संघटनेतून निलंबित करण्यात आलं असून त्यांच्याशी कोणीही संबंध ठेवू नये”.
म्हत्वाच्या बातम्या-
वेब सीरिजच्या नावाखाली करायची अ’श्लिल व्हीडिओ शुट; बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला अटक
‘पुण्यातच चोपायला पाहिजे होता’, शर्जील उस्मानीवर राज ठाकरे रोखठोक
‘मला भारतत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा’ रतन टाटांचे भावूक अवाहन
उद्धव ठाकरेंवर घाणेरडी टीका करणाऱ्या भाजप नेत्याला शिवसैनिकांनी धू धू धूतले

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.