सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर भाजप(BJP) आमदार नितेश राणे(Nitesh Rane) काल सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर शरण आले. त्यानंतर आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयासमोर शरण येण्यापूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘समय बलवान होता है’ असा आशयाचे ट्विट करत ठाकरे सरकारला टोला लगावला होता.(Nitesh Rane’s strong reply haters)
हे ट्विट करत असताना आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा सीबीआयने अटक केल्यानंतरचा फोटो शेअर केला होता. पण हे ट्विट आमदार नितेश राणे यांना महागात पडल्याची चर्चा होत होती. त्यामुळे केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांचा फोटो असलेले हे ट्विट आमदार नितेश राणे यांनी डिलीट केले होते. पण आमदार नितेश राणे यांनी डिलीट केलेले हे ट्विट केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या फोटोसहित पुन्हा पोस्ट केले आहे.
ठाकरे सरकारला इशारा देण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी हे ट्विट केले होते. आमदार नितेश राणे यांना हे ट्विट डिलीट करण्यासाठी थेट दिल्लीतून आदेश आले आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगत होती. पण आमदार नितेश राणे यांनी पुन्हा हे ट्विट टाकल्यामुळे या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या व्यक्तींना जोरदार प्रत्युतर दिले आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1489228752072556553?s=20&t=cX9640hVzHMBFZ9j7bHSRQ
२००९ मध्ये पी. चिदंबरम गृहमंत्री असताना अमित शहा यांना अटक करण्यात आली होती. या घटनेची माहिती देणारे ट्विट भाजप आमदार नितेश राणे यांनी केले होते. या ट्विटमध्ये आमदार नितेश राणे यांनी आणखी एका घटनेचा उल्लेख केला आहे. १० वर्षानंतर अमित शहा गृहमंत्री असताना पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती.
या घटनेचा उल्लेख करताना आमदार नितेश राणे यांनी “समय बडा बलवान होता है, इन्सान खामखा गुरुर करता है” असे कॅप्शन देत ठाकरे सरकारला टोला लगावला होता. संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर आमदार नितेश राणे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यात आला आहे.
यानंतर आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायलायसमोर शरण आले आणि त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये येण्याची तयारी सुरु केली आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गमधील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. आमदार नितेश राणे यांच्या अटकेसंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे कोणती प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
सलमान खानमुळे ‘Valentine Day’ला कतरिना होणार विकी कौशलपासून लांब; ‘हे’ आहे कारण
‘भिकार मालिका पहाव्या की नाही, हे सांगणारे विक्रम गोखले कोण?’
वडिलांच्या निधनानंतर अभिनेता अजिंक्य देव हळहळला; म्हणाला, त्यांना खुप जगायचं होतं पण..