भाजप आमदार नितेश राणे हे आपल्या आक्रमक भूमिकांसाठी ओळखले जातात. भाजप आमदार नितेश राणे राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत असतात. आता भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी ओला- उबेर या टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा आहे.(nitesh rane tweet about ola uber)
भाजप आमदार नितेश राणे यांनी ओला- उबेर टॅक्सी कंपन्यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला आहे. ‘ओला-उबेर मध्ये हिंदू ड्राईव्हर का नाहीत?’ असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. हिंदूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलं आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
त्या ट्विटमध्ये आमदार नितेश राणेंनी म्हंटलं आहे की, “ओला, उबर सारख्या कंपन्या हिंदूंना नोकरी का देत नाहीत? त्यामागची नेमकी कल्पना काय आहे?ओला, उबरचे बहुतेक चालक हिंदू नाहीत. हे मुंबईकरांच्या लक्षात आले आहे का? हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक नाही का?”, असा प्रश्न भाजप आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे.
https://www.facebook.com/NiteshRane23/posts/2921303271348810
“खूप उशीर होण्याआधी आपल्याला कार्य करण्याची आवश्यकता आहे”, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटमध्ये पुढे म्हंटलं आहे. भाजप आमदार नितेश राणेंच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी भाजप आमदार नितेश राणेंच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. तर काही लोकांनी विरोध केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ओला- उबेर या टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांबाबत ग्राहक निवारणाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने ओला- उबेर कंपन्यांना खडसावले होते. ओला- उबेर या टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी ग्राहक निवारणाच्या सूचनांचा विचार करायला हवा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता.
ओला- उबेर कंपन्यांनी ग्राहकांना तक्रार देण्यासाठी दूरध्वनी आणि ईमेल सेवा उपलब्ध करून दिलेली नाही. यासंदर्भात एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने ओला- उबेर कंपन्यांना राज्य सरकारचे नियम लागू होत नाहीत तोपर्यंत केंद्र सरकाराच्या नियमांचे पालन करण्याचा आदेश दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
Jr NTR ची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना देते टक्कर, पहा सुंदर फोटो
पवारांच्या घरावर हल्ला एसटी कर्मचाऱ्यांना भोवणार, गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ कठोर आदेश
पैसा अन् प्रसिद्धी मिळताच माझं डोकं फिरलं होतं; ‘कच्चा बदाम’फेम भुबन बड्याकरची कबुली