..म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो भाजपमध्ये या, आयुष्य सुखकर होईल- नितेश राणे

भाजप नेते नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि अनेक मुद्यांवरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत त्यांनी जोरदार टिका केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला. ते म्हणाले की गेली दोन वर्षे या सरकारने मराठा आरक्षणासाठी काय केलं आहे?

आजही समिती स्थापन होत नाहीये, सर्वे होत नाहीयेत आणि मराठा तरूणांचे वय वाढत चालले आहे. या सगळ्या बाबतीत सरकारने उत्तर दिले पाहिजे. मराठा समाजाला जर खरंच भविष्याची काळजी असेल तर कुठल्याही या महाविकास आघाडीतील मंत्र्याला महाराष्ट्रात फिरता देता कामा नये, असे ते म्हणाले.

पुढे अनिल परबांवर टीका करताना ते म्हणाले की, त्या अनिल परबांच्या घराबाहेर एवढे पोलिस ठेवले आहेत की जसं काय त्याच्या डोक्यावर कोणीतरी डायमंड ठेवलाय आणि तो कोणीतरी उचलून घेऊन जाणार आहे. एका बाजूला तुम्हाला दारू पिणाऱ्या लोकांची चिंता आहे पण मराठा समाजातील मुलांच्या भविष्याची चिंता नाही.

अनिल परब हा कलेक्शन एजंट आहे तो मंत्री नाहीये. तो कुठल्याही ऍंगलने तुम्हाला मंत्री दिसतो का? नाक्यावर उभा राहिला तर कोणीतरी वर्गणी देऊन जाईल त्याला. अशा माणसाकडून तुम्ही एसटीचं भलं होईल अशी अपेक्षा कशी ठेवता. तो कारकून आहे मातोश्रीमधला.

त्याला जर तुम्ही मंत्रीपदाची जबाबदारी दिली तर असंच होणारे. उद्धव ठाकरेंवर टिका करताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब नाहीत. बाळासाहेब वेगळे होते. उद्धव ठाकरे हे वापरा आणि फेकून द्या या चौकटीतले आहेत. शिंदे साहेबांनी वाट पाहू नये अशी मी त्यांना विनंती करतो.

फार चांगलं काम करतायत ते. वय घालवू नका, श्रीकांतपण वयाने वाढतोय. आमच्या बाजूला बसवा, आम्ही दुप्पट मतांनी निवडून आणू. माझी अशी इच्छा आहे की एवढा चांगला नेता आहे. बाळासाहेबांच्या पठडीतून तयार झालेला एक कडवट शिवसैनिक आहे.

आज शिंदे साहेबांना दोन वर्षे झाले वेटींगला ठेवलं आहे. ते मुख्यमंत्री व्हायला हवे होते. जर पुन्हा मुख्यमंत्री बदलायची वेळ आली तर हे आदित्य ठाकरे यांच्याशिवाय दुसरा कोणाचा विचार करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो तिथे काही आयुष्य नाहीये. भाजपमध्ये या आणि आयुष्य सुखकर करा, असे नितेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
जबरदस्त! फक्त ३५५५ च्या हप्त्यावर घरी न्या टाटांची ‘ही’ आलिशान कार, टाटांनी आणली भन्नाट स्कीम
३८ वर्षीय मिताली राज ‘या’ बॉलिवूड सुपरस्टारवर झाली फिदा; म्हणाली, मला तो खुप आवडतो
निकाहाचे फोटो पोस्ट करणाऱ्या मलिकांना वानखेडेंचे सडेतोड प्रत्यूत्तर; केले असे काही की…
दीपक चाहरचा ९० मीटरचा गगनचुंबी षटकार पाहून रोहितने ठोकला सलाम, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.