“ही सगळी बेबी पेंग्वीनची नाईटलाईफ गँग”, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई | भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी मुंबईतील लालबाग येथे शेतकरी आठवडे बाजारात शिवसेना नगरसेवक आणि स्थानिक नेते शेतकऱ्यांच्या आठवडी बाजारावर महापालिकेला हाताशी धरून दबाव आणून ते बंद करत असल्याचा आरोप केला आहे.

याविरोधात प्रसाद लाड यांनी भाजपा आमदार नितेश राणे, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत आंदोलन केले आहे. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“लॉकडाऊनचे नियम तुडवत वरळीत दिशा पटानीच्या चित्रपटाचं शुटींग सूरू असतं. मात्र दिशा पटानी, डिनो मोरीया यांना सर्व नियम तुडवण्याची परवानगी आहे. वरळीत, वांद्र्यात पब सूरू आहेत. ही सगळी बेबी पेंग्वीनची नाईटलाईफ गँग आहे”. असं नितेश राणे म्हणाले आहेत.

पुढे म्हणाले की, “आम्ही आठवडे बाजार बंद होऊ देणार नाही, आठवडे बाजारात ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून स्वस्त दरात भाज्या मिळत आहेत. पण शिवसेनेचे काही नेते आठवडे बाजार बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही संघर्ष सुरूचं ठेवू.” असं म्हणतं नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

दरम्यान विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत अनेक ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार सूरू करण्यात आले होते. मात्र शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना हप्ते मिळत नसल्याने त्यांच्याकडून आठवडे बाजार बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.
महत्नाच्या बातम्या-
“ममतादीदींनी लोकांचा विश्वासघात केला”, पंतप्रधान नरेंद्र मोदी ममता बॅनर्जींवर आक्रमक
“वर्षा बंगल्यावर धूणीभांडी, वॉचमनचं तरी काम द्या”, बेरोजगारांची मुख्मंत्र्यांकडे मागणी
भाजपात प्रवेश करताच मिथून चक्रवर्ती यांचा विरोधकांना इशारा, म्हणाले “मी खरा कोब्रा….”

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.