मौका सभी को मिलता है! सत्यामधला ‘तो’ भयानक व्हिडीओ शेअर करत नितेश राणेंची शिवसेनेला थेट धमकी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्या पुणे क्राईम ब्रांचकडून लूकआऊट नोटीस जाही करण्यात आली आहे. त्यामुळे आता राणे कुटुंबाच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

त्याच पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी शिवसेनेला थेट धमकी दिली आहे. मौका सभी को मिलता है! हा डायलॉग असलेला सत्यामधला भयानक व्हिडीओ शेअर करत नितेश राणेंनी शिवसेनेला थेट धमकी दिली आहे. आता यावर शिवसेना काय प्रतिक्रीया देते हे बघावे लागेल.

या व्हिडीओत मनोज वाजपेयी जे डी चक्रवर्तीचा गळा आवळतो. परंतू काही क्षणातच जेडी पुन्हा पकड घेतो व मनोज वाजपेयीचा गळा आवळत म्हणतो की मौका सभी को मिलता है! यावरून नितेश राणेंना काय सांगायचे आहे ते लगेच कळते. याला त्यांनी याद रखना ही कॅप्शन दिली आहे.

आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आई निलम राणे यांच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून ४० कोटींचे कर्ज घेण्यात आले होते, पण त्यापैकी २५ कोटींच्या कर्जाची परतफेड करण्यात आली नव्हती. त्यामुळे कंपनीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा लुकआऊट जारी करण्यात आला आहे.

आता या प्रकरणावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लुकआऊट सर्क्युलर म्हणजे एअरपोर्ट प्रशासनाला त्यांनी मी आणि माझी आई देश सोडून जाऊ शकत नाही, असं सांगितलं आहे. हे सर्क्युलर पुणे पोलिसांनी काढले आहे. पण हे आमचं डीएचएफएल खातं मुंबई ब्रांचमध्ये आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना आमच्यावर ही कारवाई करण्याचा अधिकार कोणी दिला, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

पाच महिन्याअगोदर आम्ही संबंधित बँकेला कर्ज सेटल करायचे आहे, असे अधिकृतपणे पत्र दिले आहे. त्यानंतरही अशाप्रकारचे सर्क्युलर निघत असेल तर आम्ही दिलेल्या पत्राचा काय फायदा, त्यामुळे आम्ही आता हाय कोर्टाच आव्हान देऊ, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

माध्यमांमध्ये राणे कुटुंबीय अडचणीत असं चालवलं जात आहे. ते पुर्णपणे चुकीचं आहे. आता पुणे क्राईम ब्रांचची अडचण होणार आहे. आता महाविकास आघाडी सरकारची अडचण होणार आहे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.