राणे कुटुंबाविरूद्ध लुकआऊट नोटीस! संतप्त नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्या पुणे क्राईम ब्रांचकडून लूकआऊट नोटीस जाही करण्यात आली आहे. त्यामुळे आता राणे कुटुंबाच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आई निलम राणे यांच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून ४० कोटींचे कर्ज घेण्यात आले होते, पण त्यापैकी २५ कोटींच्या कर्जाची परतफेड करण्यात आली नव्हती. त्यामुळे कंपनीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा लुकआऊट जारी करण्यात आला आहे.

आता या प्रकरणावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लुकआऊट सर्क्युलर म्हणजे एअरपोर्ट प्रशासनाला त्यांनी मी आणि माझी आई देश सोडून जाऊ शकत नाही, असं सांगितलं आहे. हे सर्क्युलर पुणे पोलिसांनी काढले आहे. पण हे आमचं डीएचएफएल खातं मुंबई ब्रांचमध्ये आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना आमच्यावर ही कारवाई करण्याचा अधिकार कोणी दिला, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

पाच महिन्याअगोदर आम्ही संबंधित बँकेला कर्ज सेटल करायचे आहे, असे अधिकृतपणे पत्र दिले आहे. त्यानंतरही अशाप्रकारचे सर्क्युलर निघत असेल तर आम्ही दिलेल्या पत्राचा काय फायदा, त्यामुळे आम्ही आता हाय कोर्टाच आव्हान देऊ, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

माध्यमांमध्ये राणे कुटुंबीय अडचणीत असं चालवलं जात आहे. ते पुर्णपणे चुकीचं आहे. आता पुणे क्राईम ब्रांचची अडचण होणार आहे. आता महाविकास आघाडी सरकारची अडचण होणार आहे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

विप्रो कंपनीत काम करणारा विनायक माळी उर्फ दादूस कसा झाला कॉमेडीचा बादशहा?
मोठी बातमी! नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी
सुंदर पिचाई यांना आपल्या पत्नीला भेटायला उशीर झाला आणि गुगल मॅप्सची स्थापना झाली, वाचा किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.