“संजय राऊत उद्धव ठाकरेंकडून पगार घेतात की शरद पवारांकडून, हे तरी त्यांनी सिद्ध करावं”

महाविकास आघाडीमध्ये अजूनही काही कुरबूरी सुरु असल्याच्या दिसून येत आहे. शिवसेना नेते अंगत गीते यांनी दोन काँग्रेस एकविचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकत नाही, असे विधान खळबळजनक विधान केले आहे. तसेच अनंत गीते यांनी शरद पवारांवरही टीका केली आहे.

अंनत गीते यांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला माहित नाही अनंत गीते असे का म्हणाले, पण शरद पवार हे महाविकास आघाडीचे मुख्यस्तंभ आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

आता संजय राऊतांच्या या वक्तव्यावरुन भाजप नेतेही संजय राऊतांवर निशाणा साधताना दिसून येता आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवर टीका केल्यानंतर आता नितेश राणे यांनीही संजय राऊतांना टोला लगावला आहे.

संजय राऊत स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेतात, बाळासाहेबांना आपला नेता मानतात. पण आता महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अनंत गीते यांनी काही बोलले तर ते त्यांचे वैयक्तीक मत झाले. मग संजय राऊतांचे वैयक्तीक मत काय की मी पवारांचा माणूस आहे?

संजय राऊतांनी मी पवारांचा माणूस आहे असं जाहीर करावं. संजय राऊत स्वत;ला शिवसैनिक मानत नाही का? ते उद्धव ठाकरेंकडून पगार घेतात की शरद पवारांकडून पगार घेतात. हे तरी त्यांनी सिद्ध करावं, असा टोला नितेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

दरम्यान, अनंत गीते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असून शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाही, असे अनंत गीते यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

सायरस मिस्त्रींना कंपनीच विकायला लागली, रतन टाटांशी घेतलेला पंगा पडला महागात  
‘सुप्रियाताई, किरीट सोमय्यांचे लक्ष सद्या बेनामी संपत्तीवर आहे; ते वांग्याच्या शेतीकडे वळाले तर तुमचे अवघड होईल’
पुण्यातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघाती मृत्यु, गोव्यात फिरायला गेले असताना कार खाडीत कोसळलीmxp/

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.