ठाकरे सरकारला मोहरमची गर्दी चालते पण गणेशोत्सावासाठी लोक निघाले की लगेच यांचा कोरोना निघतो- नितेश राणे

गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात मोठ्या प्रमाणात लोक कोकणात जात असतात. पण दोन वर्षांपासून कोरोनामुळे लोकांना कोकणात जाता आले नाही. त्यामुळे आता त्या लोकांसाठी ट्रेन उपलब्ध करुन देण्यावरुन विरोध पक्षातील नेते राज्य सरकारवर निशाणा साधताना दिसून येत आहे.

कोकणात भाजपचा मी एकटाच आमदार आहे. तरीही मी कोकणवासीयांसाठी मोदी एक्सप्रेस सोडू शकतो. तर शिवसेनेच्या आमदारांनी किमान अर्धी ट्रेन तरी सोडायला पाहिजे, असा टोला भाजप नेते नितेश राणे यांनी लगावला आहे.

नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला होता. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दादरहून सावंतवाडीपर्यंत मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली आहे.

तसेच या ट्रेनवरुन नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कोकणात दोन वर्षांपासून लोक गेलेले नाहीत, कोरोनामुळे त्यांना जाता आले नाही. त्याची उणीव आज भरुन काढली आहे. जर आम्हाला हे करता येते, तर इतरांनीही यातून धडा घ्यावा, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात मी एकटाच आमदार आहे. बाकी सेनेचे आमदार आहे. एक भाजपचा आमदार करु शकतो ते शिवसेनेला जमले नाही याचा मला अभिमान आहे. पुढच्या येणाऱ्या निवडणूकीत कोकणाच्या जनतेने विचार करावा, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारला सर्व गर्दी हिंदू सणांवरच दिसते. दहीहंडी, गणेशोत्सवात गर्दी दिसते. यांचे नातेवाईक गर्दी करतात ते दिसत नाही. नितीन राऊतांनी राज्य सरकारमध्ये असलेले कोरोना स्प्रेडर पाहावे. ते मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करुन गर्दी करत आहे. या सरकारला मोहरमची गर्दी चालते पण गणेशोत्सवात लोक निघाले की कोरोना निघतो, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

इंग्लड विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताच्या ‘या’ चार खेळाडूंनी केले जबरदस्त प्रदर्शन; त्यांच्यामुळेच इंग्लंडचा झाला पराभव
भारतीय संघात विराटसारखा कर्णधारच झाला नाही! ‘ही’ आकडेवारी पाहूण तुम्हीही म्हणाल खरं आहे
अक्षयकुमारच्या आईची तब्येत गंभीर, शुटींग सोडून घेतली हॉस्पिटलमध्ये धाव; चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.