ईडीने मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राजकीय वातावरण तापल असून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.(nitesh rane new tweet about uddhav thakre)
या प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या राजीनाम्याचा जुना किस्सा सांगितला आहे. आमदार नितेश राणे यांनी केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या ट्विटमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हंटलं आहे कि, “इतिहास सांगतो…मनोहर जोशीजींच्या जावयावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेव्हण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. हाच नियम येथे लागू होतो का? की शिवसैनिकांना वेगळे नियम आहेत?”
https://www.facebook.com/NiteshRane23/posts/2906952812783856
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भावावर काल ईडीने मोठी कारवाई केली होती. श्रीधर पाटणकर यांच्या ११ सदनिका ईडीने जप्त केल्या होत्या. ठाणे येथील निलांबरी प्रोजेक्टमधील या सदनिका ईडीने जप्त केल्या होत्या. तसेच ईडीने पुष्पक ग्रुपची तब्बल ६ कोटी ४५ लाखांची संपत्तीही जप्त केली होती.
या सदनिका साईबाबा ग्रुहनिर्माण म्हणजे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीच्या नावावर आहेत. हे प्रकरण २०१७ सालचे आहे. त्यावेळी पुष्पक बुलीयन्स कंपनीवर ईडीने गुन्हा दाखल केला होता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईत पुष्पक बुलीयन्स कंपनीची तब्बल २१ कोटींची मालमत्ता याआधीच जप्त करण्यात आली आहे. ही संपत्ती महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची आहे.
ईडीच्या या कारवाईवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. “महाराष्ट्र ठाकरे कुटुंबाला ओळखतो. याची किंमत आज ना उद्या तुम्हाला चुकवावीच लागेल”, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला होता. ईडीची कारवाई ही तर खतरनाक हुकूमशाहीची सुरुवात आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या :-
काळीज चिरणारी घटना! भावाला झोका देत असताना भावा-बहिणीवर काळाचा घाला
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली तर सोनं करून दाखवेन- रुपाली पाटील ठोंबरे
मी विधानपरिषद सदस्याची मुलगी पळवून लग्न केलं, त्याच वेळी ठरवलं की एक ना एक दिवस आमदार व्हायचं’