सचिन वाझेंनी IPL खेळाडूंकडे खंडणी मागितली; नितेश राणेंचा गंभीर आरोप

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. कोर्टानं त्यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

या सर्व प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापलं आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी सचिन वाझेंवर एक गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे यांनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून दीडशे कोटींची खंडणी मागितली होती. त्यामुळे या प्रकरणाचीही एनआयएने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राणे यांनी केली आहे.

ते याबाबत पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. ते म्हणाले, ‘देशात चांगल्या हेतूने आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. त्यातून नवोदित क्रिकेटपटूंनाही वाव मिळत आहे. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता.

तसेच या सट्टेबाजांना तुमचं लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती, असा दावा नितेश राणे यांनी यावेळी बोलताना केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

संतापजनक! मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मुस्लिम मुलाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

“…तर सचिन वाझे यांना जामीन मिळू शकतो”- ऍड असीम सरोदे

देवेंद्र फडणवीस ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’ म्हणणाऱ्या गोपीचंद पडळकरांना लोकांनी धु धु धुतले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.