IPL, सचिन वाझे, १५० कोटींची खंडणी; भाजप आमदाराचे एका मागोमाग एक गौप्यस्फोट

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापलं आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी सचिन वाझेंवर गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे यांनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून दीडशे कोटींची खंडणी मागितली होती. त्यामुळे या प्रकरणाचीही एनआयएने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राणे यांनी केली आहे.

ते याबाबत पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. ते म्हणाले, ‘देशात चांगल्या हेतूने आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. त्यातून नवोदित क्रिकेटपटूंनाही वाव मिळत आहे. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता.

तसेच या सट्टेबाजांना तुमचं लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती, असा दावा नितेश राणे यांनी यावेळी बोलताना केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

आमिर खानने घेतला धक्कादायक निर्णय; कायमचा रामराम ठोकत म्हणाला..

शाहरुख खानची पत्नी बनायला ऐश्वर्याने दिला होता नकार; म्हणाली, हा तर…

झोपडीत राहणाऱ्या मुलाचा डान्स पाहून माधुरीही झाली होती फिदा; झळकला डान्स दिवानेमध्ये, व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.