“आपल्याच भावाचे ७ नगरसेवक फोडणाऱ्यांना या ५ जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का ?”

मुंबई | अहमदनगरच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण आज याच पाच नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्याने हे नगरसेवक खूप चर्चेत आले आहेत.
मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. यावरूनच भाजपाचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे
गेल्या तीन वर्षांपूर्वी मनसेच्या ७ नगरसेवकांनी शिवसेनेत शिवसेनेत प्रवेश केला होता. याची आठवण करून देत नितेश राणे म्हणाले आहेत की, आपल्याच भावाचे सात नगरसेवक फोडणाऱ्यांना या पाच जणांना परत घेताना तरी का लाज वाटेल ?
जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी करून दाखवलं असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लावला आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की, आपल्याच भावाचे 7 नगरसेवक फोडणाऱ्यांना या 5 जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का? जे ऐका भावाला नाही जमल ते अजित दादांनी शब्दासाठी “करून दाखवले” !! जय महाराष्ट्र!!
आपल्याच भावाचे 7 नगरसेवक फोडणाऱ्यांना या 5 जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का?
जे ऐका भावाला नाही जमल ते अजित दादांनी शब्दासाठी "करून दाखवले" !!
जय महाराष्ट्र!!
— nitesh rane (@NiteshNRane) July 8, 2020
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.