“संजय राऊतांना ईडीच्या नोटिसा आल्यामुळे ते जास्त फडफड करत आहेत”

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खळबळ माजलेली आहे. एकीकडे प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेली कारवाई आणि दुसरीकडे या कारवाईवरून पेटलेले राजकारण. याचदरम्यान आता नितेश राणे यांनी दावा केला आहे की, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीच्या नोटिसा आल्या आहेत.

या दाव्याने पुन्हा राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. हिंगोलितल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की जेव्हा प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केली होती तेव्हाच संजय राऊत यांच्या कुटूंबियांना ईडीने नोटिसा पाठवल्या होत्या अशी माहिती आहे.

संजय राऊतांना ईडीच्या नोटीसा मिळाल्यामुळेच ते जास्त फडफड करत आहेत. ईडीच्या नोटीस मिळाल्याने संजय राऊत हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नव्हते ना? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

दरम्यान, संजय राऊत म्हणाले होते की, कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे अशा तिखट शब्दात संजय राऊत यांनी टीका केली होती.

आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीने कार्यालये थाटली तरी आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे वागत आहे असेही संजय राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

बारावीच्या परीक्षेबद्दल बोर्डाने दिली महत्वाची माहिती; वाचा कशी व कधी होणार परीक्षा?

पुणेकरांनी शोधलेल्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये’; सुप्रिया सुळेंनी दिला मोदींना इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.