नितेश राणेंनी जाहीर केली शिवसेनेतील बाटग्यांची यादी; नावे वाचून धक्का बसेल

मुंबई। भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी वेळ पडली तर आम्ही सेनाभवन पण फोडू असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ सुरु झाली आहे. भाजप व शिवसेना एकमेकांवर टीका करत आहे. तर दुसरीकडे प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसैनिक प्रचंड संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

अशातच राजकीय वर्तुळात कोणतीही घटना घडली की दुसऱ्या दिवशी ‘सामना’ च्या अग्रलेखातून त्या घटनेवर टीका केली जाते. भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हतं. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे.

त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केली होती. याच टीकेला आता नितेश राणे यांनी ट्विटमधून संजय राऊतांना सडेतोड उत्तर दिलं आहे. कारण अग्रलेखात जरी राऊतांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांनी नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र, पडळकर आणि प्रसाद लाड यांच्याकडे त्यांचा निशाणा होता.

राऊतांनी ‘बाटग्यांवरुन’ केलेली टीकेला आता नितेश राणेंनी लांबलचक ट्विट करत उत्तर दिल आहे. काय म्हणालेत नितेश राणे पाहुयात.

शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहितीसाठी, असं म्हणत त्यांनी शिवसेनेतील आयारामांची काही नावे सांगितली आहेत. सचिन आहिर – bks ची जबाबदारी… राहुल कनाल – शिर्डी संस्था… आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था… उदय सामंत – कॅबिनेट मंत्री… अब्दुल सत्तार – मंत्री….

प्रियांका चतुर्वेदी – खासदार डाके..रावते..रामदास कदम..शिवतारे..राजन साळवी, सुनील शिंदेंसारखे जुने सैनिक दिसणार नाहीत.. स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषण द्यायची, अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
गणपती-दिवाळीत यंदाही शुकशुकाट; ऑक्टोबरमध्ये कोरोनाची भयंकर स्थिती निर्माण होणार
ही गाडी घालणार मार्केटमध्ये धुमाकूळ, केवळ 8 मिनिटांत चार्ज, रेंजचे तोडले सर्व विक्रम, वाचा..
वेदनादायी! 16 कोटींच्या इंजेक्शनंतरही 11 महीन्यांच्या वेदिकाची मृत्यूशी झुंज अपयशी
धक्कादायक! पोहण्यात पटाईत असूनही महाराष्ट्रातील नेव्ही ऑफिसर धबधब्यात गेला वाहून, शोधकार्य सुरू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.