देशात आणि जगात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. आता इलेक्ट्रिक कारच्या शर्यतीत जगभरातील सर्व कंपन्यांनी प्रवेश केला आहे. निसान(Nissan) या कार निर्मात्या कंपनीने देखील इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. निसान कंपनीने घोषणा केली आहे की, ती लवकरच आपली सर्व-नवीन इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट कार लाँच करणार आहे.(nissan-new-electric-cheap-price-car)
ही कार फ्रान्समधील(France) निसान कारखान्यात बनवली जाणार असून ती अत्यंत किफायतशीर किंमतीत ग्राहकांना मिळणार आहे. कंपनीने आतापर्यंत ही छोटी कार केवळ युरोपमध्ये विकण्याचे ठरवले होते. पण आता ही कार भारतीय बाजारपेठेत देखील मिळणार आहे. या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, आगामी इलेक्ट्रिक कारला गोल आकाराचे एलईडी हेडलॅम्प मिळतील, जे एलईडी हेडलाइटसह येतील.
या कारमध्ये रुफलाईनचाही वापर करण्यात आला असून तो अतिशय सुंदर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी पहिल्यांदा ही कार युरोपियन मार्केटमध्ये सादर करणार आहे. रेनॉल्ट-निसान-मित्सुबिशी यांच्यातील करारानंतर कंपनीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्यांदा ३० इलेक्ट्रिक वाहने सादर केली जाणार आहेत.
यामध्ये पाच EV प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. हे पाच ईव्ही प्लॅटफॉर्म ९० टक्के इलेक्ट्रिक कारमध्ये वापरले जाण्याची शक्यता आहे. या कारबद्दल माहिती देताना निसानचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अश्वनी गुप्ता म्हणाल्या की, “हे सर्व-नवीन मॉडेल निसानने डिझाइन केले आहे आणि त्याचे अभियांत्रिकी आणि उत्पादनाचे काम निसान करणार आहे.”
“या कारसाठी नवीन कॉमन म्हणजेच एकत्रित प्लॅटफॉर्म वापरला जाईल. या कारच्या निर्मितीकरता करार केला जाणार आहे. या कारचे उत्पादन जास्तीत जास्त केले जाईल, परंतु निसान-नेस या कारचे उत्पादन कायम ठेवले जाईल”, असे निसान कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अश्वनी गुप्ता यांनी सांगितले.
निसान कंपनीने या नवीन कारचा एक लुक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये कारचे गोल हेडलॅम्प आणि त्याच्या सभोवतालचे एलईडी डीआरएल दिसत आहेत. २०३० पर्यंत कंपनीने १५ पेक्षा जास्त मॉडेल्स CMF-EV प्लॅटफॉर्मवर आधारित तयार करण्याचे ठरवले आहे. या प्लॅटफॉर्मवर वर्षाला १.५ दशलक्ष कार तयार होतील, असे कंपनीने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
PHOTO: लेहंगा-चोलीमध्ये फोटो शेअर करत शहनाज म्हणाली, दिवस कसा आहे? चाहते म्हणाले..
‘वापरून टाकून द्यायला मी काय टिशू पेपर आहे का?’ राखी सावंत बिग बॉसवर संतापली, पहा व्हिडीओ
वाढदिवसाच्या दिवशीच श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिले खास गिफ्ट, ‘या’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला