मारुती व टाटाला टक्कर द्यायला या कंपनीने आणली स्वस्तातली SUV, किंमत फक्त…

nissan कंपनीने बऱ्याच काळानंतर आपली नवीन कार लॉन्च केली आहे जी कॉम्पॅक्ट SUV आहे. जीचे नाव मागणीत आहे. nissan ने या कारच्या किमती जाहिर केल्या आहेत. ह्या कारची विशेष किंमत फक्त ४ लाख ९९ हजार ठेवण्यात आली आहे. पण ही किंमत फक्त ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मर्यादित आहे.

या नव्या मिनी SUV मध्ये लाइट्सएबर-स्टाइल टर्न इंडिकेटर्ससह अत्यंत आकर्षक हेडलँप्स, एल-शेप एलईडी डीआरएल, डॉमिनेटिंग फ्रंट ग्रिल देण्यात आले आहे. ही गाडी nissan next या धोरणाअंतर्गत बनवण्यात आली आहे. २०२०-२१ च्या दुसऱ्या सहामाहीत ही गाडी रस्त्यावर धावणार आहे.

फीचर्स- या गाडीमध्ये वायरलेस चार्जर, एअर प्युरीफायर, पॅडल लॅम्प, मूड लायटिंग, JBL चे प्रीमियम स्पीकर्स देण्यात आले आहेत. तसेच स्प्लिट फोल्ड होणारे सीट्स असल्याने लगेज स्पेस वाढवता येते. लगेज स्पेसची क्षमता ३३६ लिटर आहे.

वेलकम ऍनिमेशन, टीएफटी मीटर, टायर प्रेशर मोनिटरिंग सिस्टीम, फुल फ्लश ८ इंच टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. वायरलेस अँपल कारप्ले तसेच अँड्रॉइड ऑटो व बिल्ट इन व्हॉइस रेकग्निशन इ फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार 20 किमी प्रति लिटरचे मायलेज देईल असा दावा करण्यात आला आहे.

HRAO १.० लीटर टर्बो इंजिन देण्यात आले आहे. मॅन्युअल ५ स्पीड आणि एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी गिअरबॉक्स या गाडीमध्ये बसवण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यामध्ये ABS, EBD, HBA, VDC , TCS, HSA, speed sensing door control lock, central locking, SRS dual air bag इत्यादी फीचर्स देण्यात आले आहेत.

ही गाडी Kia, tata, maruti suzuki, toyota, hyundai च्या गाड्यांना टक्कर देण्यासाठी मैदानात उतरली आहे. कारण हिची सुरुवातीची किंमत nissan ने खूप कमी ठेवली आहे. ही ऑफर फक्त ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या-

अशा प्रकारे शरद पवारांनी थांबवलं होतं अजित पवारांचे बंड; एकदा वाचाच….

तुमची लाडकी प्राजक्ता माळी ‘या’ मुलासोबत करणार लग्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.