२४ तासांच्या आत मोदी सरकारने निर्णय फिरवला! बॅंक डिपाॅझीटवरील व्याजकपातीचा निर्णय मागे…

मुंबई : अर्थ मंत्रालयाकडून बुधवारी जारी झालेल्या आदेशानुसार, छोट्या योजनांवरील व्याज दर १.१० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते, १ एप्रिल २०२१ म्हणजेच आजपासून याची अंमलबजावणी सुरू होणार होती. या निर्णयाने अनेक सर्वसामान्यांना मोठा झटका बसला.

अनेक स्तरातून केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात करण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाकडून मागे घेण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. निर्मला सीतारमन यांनी हा आदेश चुकून निघाल्याचं सांगत व्याजदर जैसे थे राहतील असे स्पष्ट केले.

ट्विट करत निर्मला सीतारमन म्हणतात, ‘केंद्र सरकारच्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात होणार नाही, २०२०-२१ च्या अंतिम तिमाहीमध्ये जे दर होते ते यापुढेही कायम राहतील. छोट्या योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने परत घेतला आहे.’

वाचा काय होता निर्णय?
केंद्र सरकारने 1 एप्रिल या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपूर्वीच सामान्यांना मोठा आर्थिक झटका दिला होता. केंद्राने जवळपास सर्वच बचत योजनांमध्ये व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

यात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारनं धक्का देत व्याज दरात ७० बेसिस पॉईंटची कपात केली होती. पीपीएफचा व्याजदर ७.१ टक्के होता. परंतु केंद्राच्या निर्णयामुळे तो ६.४ टक्क्यांवर आला होता. मात्र आता पूर्वीप्रमाणेच ७.१ टक्के व्याजदर मिळणार आहे.

पाच वर्षांच्या नॅशनल सेविंग्स स्कीमवरील व्याजदरातही ९० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. आधी गुंतवणुकीवर ६.८ टक्के व्याज मिळायचं. हे व्याजदर आता कायम राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

राजू शेट्टींचं चॅलेंज; ‘गोकुळची निवडणूक लढवायची असेल तर…’

गृहमंत्र्यांवरील आरोपांसंबंधी पुरावे आहेत का? कोणी काहीही सांगेल मग लगेच चौकशीचे आदेश द्यायचे का?

‘तुम्हाला गुन्हा दाखल करण्यापासून कुणी थांबवलं होतं?’ परमबीरसिंहांना हायकोर्टानं सुनावलं…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.