आमच्या योजना जावयांसाठी नाहीत, त्या गरीबांसाठी आहेत; निर्मला सीतारमन यांचा टोला

 

शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२१-२२ चा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी मुद्रा योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षाला चांगलेच धारेवर धरले आहे.

मुद्रा योजनेअंतर्गत २७ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कर्ज देण्यात आली आहे, हि सर्व कर्ज कोणत्या जावायाने घेतलीय का?, असे म्हणत निर्मला सीतारमण यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

तसेच जावई (दामाद) हा शब्द काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही. प्रत्येक घरात जावई असतो पण काँग्रेससाठी जावई विशेषनाम झाले आहे, असेही निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.

ऑगस्ट २०१६ पासून जानेवारी २०२० पर्यंत ३.६ लाख कोटी रुपयांचे युपीआय ट्रान्झेक्शन झाले, युपीआयचा वापर श्रीमंत व्यक्ती करत नाही, तर मध्यमवर्गीय आणि लहान व्यापारी करत असतो. हि लोकं कोण आहे. सरकारने कोणाच्या जावायासाठी तयार केलेले नाही, असे म्हणत निर्मला सीतारमण यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

गावांचा विकास, तिथल्या रस्त्यांची निर्मिती, गावागावांमध्ये वीज, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम यासर्व योजना गरिबांसाठीच होत्या. मोठमोठ्या भांडवलदारांसाठी नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.