Share

‘त्या’ दिवशी खरंच माणसातल्या देवाला भेटल्याचा अनुभव घेतला; रमेश देव यांच्या निधनानंतर भावूक झाला निलेश साबळे

ramesh deo death

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांचं बुधवारी (२ फेब्रुवारी) ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन (ramesh deo death) झाले. ते ९३ वर्षांचे होते. नुकतीच ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३वा वाढदिवस साजरा केला होता. तर बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा परसली असून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अनेकजण त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. यादरम्यान ‘चला हवा येऊ द्या’ फेम निलेश साबळे यांनीही एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

निलेश साबळे यांनी इन्स्टग्राम हँडलवर रमेश देव यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘मोठा माणूस! या वयातही आम्हाला लाजवेल हा उत्साह आणि शेवटपर्यंत कलाकार म्हणून काम करण्याची इच्छा! हे आम्ही आत्ताच २७ जानेवारीला अनुभवलं. सरांनी ‘हे तर काहीच नाय’ मध्ये येवून आम्हाला आर्शीवाद दिला. सगळंच स्वप्नवत! त्यांच्या आयुष्यातले मंतरलेले किस्से त्यांनी सांगून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तोंडभरून कौतुक केलं. त्या दिवशी खरंच माणसातल्या ‘देवाला’ भेटल्याचा अनुभव आम्ही घेतला’.

पुढे निलेश साबळे यांनी लिहिले की, ‘पुढच्याच आठवड्यात ‘चला हवा येवू द्या’ मध्ये संपूर्ण कुंटुंबासह ते येणार होते. आत्ता बातमी ऐकून खरंच काही सुचत नाही, अशी आमची सर्वांचीच अवस्था झाली आहे. पण २७ तारखेचा तो संपूर्ण दिवस तुमच्या जवळ आम्हाला वावरता आलं, कलाकारातला माणूस कसा असावा आणि किती मोठा असावा याचा अनुभव आम्हाला आला. देव साहेब आपण खरंच ग्रेट आहात आणि नेहमी रहाल…!’

दरम्यान, रमेश देव यांनी आपले पूर्ण जीवन चित्रपट आणि अभिनयाला समर्पित केलं होतं. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांत काम केले.

मराठीसोबत हिंदी भाषेतील अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले. १९६२ साली आलेल्या ‘आरती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत काम केले. रमेश देव यांनी त्यांच्या कारकिर्दीत ‘पैशाचा पाऊस’, ‘भाग्य लक्ष्मी’, ‘दस लाख’, ‘मुजर्मि’, ‘खिलोना’, ‘जीवन मृत्यु’, ‘शेर शिवाजी’, ‘दिलजला’, ‘कुदरत का कानून’, ‘गोरा’, ‘आनंद’, ‘घराना’ यासारख्या अनेक चित्रपटांत काम केले.

रमेश देव यांच्या पत्नी सीमा देव यासुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहेत. १९६२ साली आलेल्या ‘वरदक्षिणा’ या चित्रपटादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याचवर्षी दोघांनी लग्नगाठ बांधली. २०१३ साली या दोघांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाले. यावर्षी ते लग्नाचा ५९ वा वाढदिवस साजरा करणार होते. पण त्यापूर्वीच रमेश देव यांनी जगाचा निरोप घेतला.

महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO: आकाश ठोसरसोबत डेटच्या चर्चांनंतर रिंकूने पोस्ट केले खास reel, चाहते झाले घायाळ
सलमान खानमुळे ‘Valentine Day’ला कतरिना होणार विकी कौशलपासून लांब; ‘हे’ आहे कारण
वडिलांच्या निधनानंतर अभिनेता अजिंक्य देव हळहळला; म्हणाला, त्यांना खुप जगायचं होतं पण..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now