वाह अजितदादा वाह! ती शपथ विसरलात?, भाजपचा सवाल

मुंबई | राज्यातील विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहे. या निकालांमध्ये महाविकास आघाडीने पुणे, नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला आहे. या निकालावरून आता महाविकास आघाडीतील नेते भाजपावर जोरदार निशाणा साधत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. ‘या गेल्या काही दिवसांत अनेक जण वाचाळ बडबड करत होते. पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीतील निकाल हा त्या वाचाळवीरांना मोठी चपराक असल्याचे ते म्हणाले.

याचाच धागा पकडत अजित पवारांच्या या वक्तव्यावर माजी खासदार नीलेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘वाह अजित दादा वाह!! एका वर्षा पूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमु्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का? असे राणे म्हणाले.

आघाडी करून लढायचे की एक एकट्याने हे वरिष्ठ ठरवतील…

राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांनाच खडे बोल सुनावले आहे. ‘आम्ही आघाडी करून लढायचे की एक एकट्याने या संबंधीचा निर्णय आघाडीतील सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील,असे अजित पवार म्हणाले.

याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते पुढे बोलताना म्हणाले, ‘आम्ही आघाडी करून लढायचे की एक एकट्याने या संबंधीचा निर्णय आघाडीतील सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला कुणी बिन कामाचा सल्ला देण्याची काहीही आवश्यकता नाही. एकत्रितपणे लढण्याचे परिणाम या निवडणुकीच्या निकालातून समोर आले आहे, असा टोला त्यांनी मारला.

हिंमत असेल तर…

पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे.

पुढे ते म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे खच्चीकरण झालं असून राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘मुख्यमंत्रीसुद्धा शरद पवारांचं मार्गदर्शन घेतात, कॉंग्रेसने देखील स्वीकारायला हवं’
विधान परिषदेच्या निकालावर भाष्य करताना संजय राऊतांची भाजपवर टीका, म्हणाले…
“अजित दादा कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.