निलेश राणेंचा घणाघात; ‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण डरपोक…’

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसचे नेते भाई जगताप हे बरेच चर्चेत आहेत. भाई जगताप विरुद्ध अमृता फडणवीस वादात आता भाजप नेते निलेश राणेंनी उडी घेतली आहे.

“भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्यामुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं,” असे ट्विट निलेश राणेंनी केले आहे.

तसेच ते पुढे म्हणतात, ‘भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्या मुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं,’ अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे.

वाचा भाई जगताप – अमृता फडणवीस यांच्यातील वाद…
मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांचा राजीनामा घेण्यात यावा, असे म्हटले आहे.

याच मुद्द्यावरून, देशमुख यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावे, असे भाई जगताप यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरूनच अमृता फडणवीस यांनी त्यांना आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत अमृता यांनी एक ट्विट करत, “ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय!” असे म्हटले होते.

दरम्यान, यावर भाई जगताप यांनीही अमृता यांच्या या भाष्यावर प्रतिक्रिया देताना ‘खरं किती टोचतं हे अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून समोर आलं, मी केवळ सवाल केला होता’, अशी प्रतिक्रिया दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या 

‘नागपुरमधील आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्येमागे फडणवीस आणि भाजपचा हात’

सुप्रीम कोर्टात गेलेले परमबीरसिंग तोंडावर आपटले; कोर्टाने दिला ‘हा’ आदेश

मर्डर चित्रपट पाहिल्यानंतर इम्रान हाश्मीच्या पत्नीने दिली होती ‘ही’ धक्कादायक प्रतिक्रिया

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.