मुंबई | मध्यरात्री सारेच झोपेत असताना दहा नवजात बालकांवर काळाने घाला घातला. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
याचबरोबर भंडाऱ्याच्या घटनेनंतर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. याचबरोबर संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 9, 2021
याचाच धागा पकडत माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विट करत ते म्हणतात, ‘रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालेलं नाही हे लक्षात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही. अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की ते कुणालाच जुमानत नाही.’
भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालेलं नाही हे लक्षात आले त्या नंतर धरणवीर उपमुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही. अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की ते कुणालाच जुमानत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 9, 2021
याला महाराष्ट्र सरकार जबाबदार; भाजपचा आरोप
या घटनेला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. ‘भंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये १० निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू हा प्रशासनच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ही हत्या आहे. त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
निष्पाप बालकांची ही ह.त्या, याला महाराष्ट्र सरकार जबाबदार; भाजपचा आरोप
भंडाऱ्याच्या घटनेनंतर ठाकरे सरकारला आली जाग; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय…
भंडाऱ्याच्या घटनेवर राहुल गांधींनी व्यक्त केली हळहळ; ठाकरे सरकारकडे केली ‘ही’ मागणी