‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापुरती पण राहणार नाही’

मागील काही दिवसांमध्ये भाजपला काही राज्यांमध्ये सत्ता स्थापन करता आली नाही. त्याचवेळी कर्नाटक, गुजरातमध्ये देखील राजकारणात मोठी खांदेपालट झाली होती. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाना साधला आहे. ते म्हणाले आहेत की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सुत्र स्वताच्या हाती घेण्याचे ठरवले असून मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून लगावला होता.

यावरून आता राजकारण तापले आहे आणि भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की, संज्या तू तर जिथे गेलास तिथे शिवसेनेचं तोंड काळं झालं, तरी तू शिकत नाही. देशाच्या प्रत्येक राज्यात BJP आहे पण शिवसेना एकाच राज्यात आहे ती पण फक्त २०%… २०२४ निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही.

संज्या तू एक निवडणूक तरी लढव बाकी राहू दे. दरम्यान, सामना अग्रेलखात असं म्हटलं होतं की मोदी हाच भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा आहे. बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील.

मोदी यांना स्वताचे हे बलस्थान माहिती असल्यामुळेच त्यांनी २०२४ च्या तयारीसाठी साहसी पावले टाकायला सुरूवात केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी डॉ. नड्डा आल्यापासून पक्षात सतत फेरबदल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात आहे ते डॉ. नहा यांच्या माध्यमातून करून घेतले जात आहे.

नहा यांच्याच माध्यमातून उत्तराखंड व कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले गेले. गुजरातचे मुख्यमंत्रीही एका खटक्यात बदलले. तेथे तर संपूर्ण मंत्रिमंडळच नवेकोरे करून टाकले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे प्रथमच आमदार झालेले नेते, पण आता मोदी-नड्डांनी असा धक्का दिला की, राजकारणात काहीच अशक्य नाही.

रूपाणी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मोदी व नडांनी घरी बसवले आहे. ज्या 24 मंत्र्यांनी शपथ घेतली ते सर्व प्रथमच मंत्री झाले. नितीन पटेल यांच्यासह सर्व जुन्या-जाणत्यांना मोडीत काढून मोदी व नड्डा यांनी गुजरातेत नवा डाव मांडला आहे.

राजेंद्र त्रिवेदी हे विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांनाही पायउतार केले व मंत्री केले. रूपाणी यांच्यामागे अमित शहांचे पाठबळ होते, पण रूपाणी व त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळास घरचा रस्ता दाखवून मोदी-नड्डा जोडीने एक जोरदार राजकीय संदेश स्वपक्षास दिला आहे.

मावळते उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे स्वतःला ‘हेवीवेट’ समजत होते. रूपाणी यांना मुख्यमंत्री केले तेव्हाही नितीन पटेल हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते व आता रूपाणी यांना बाजूला केले तेव्हाही तेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. एकतर ते गुजरातमधील पाटीदार समाजाचे महत्त्वाचे नेते आहेत व पाटीदार समाजात त्यांचे वजन आहे असे सामनाच्या लेखात म्हटले गेले आहे.

महत्वाच्या बातम्या
राखीचा काही नेम नाही! आमदाराला म्हणाली, माझे नाव घेतले तर मी तुमचा चड्ढा उतरवेन
टिम इंडीयात उभी फूट! विराटच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे संतप्त खेळाडूंची थेट जय शहांकडे तक्रार
महावितरणाच्या वीज ग्राहकांसाठी खुषखबर! सौरउर्जा पॅनेल बसवण्यासाठी केंद्राकडून मिळणार ४० टक्के अनुदान
शास्त्रींच्या राजीनाम्यानंतर कोण होणार भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक?; वेगळेच नाव आले आघाडीवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.