‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र…’

मुंबई | मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर आपण आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले होते.

त्यानुसार ते काल गाझीपूर सीमेवर पोहोचले होते. यावेळी शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी शेतकरी नेत्यांसोबत गळाभेट घेतलेले फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

राऊत यांच्या या दौऱ्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी खालच्या शब्दात टीका केली आहे. ‘संज्या राऊत जितका झटपट दिल्ली येथील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेला तसाच कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संज्या कधी गेला नाही, महाराष्ट्रातले आंदोलनकारी नको फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला… एक नंबर ढोंगी.’

दरम्यान, गाझीपूर सीमेवर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा पाहून या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा संताप सवाल राऊत यांनी व्यक्त केला. ‘शेतकरी दिल्लीत येऊ नयेत म्हणून दिल्लीच्या सीमेवर खिळे लावले जात आहेत, हे खिळे जर भारत-चीन सीमेवर लावले असते तर चीनचं सैन्य भारतात घुसलं नसतं,’ असा टोला राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला.

तिकरी सीमेवर उभारण्यात आलेले खिळे, भिंती यासंबंधी बोलताना ते म्हणाले, “एवढे मोठे खिळे चीनच्या सीमेवर लावले असते तर चिनी सैन्य २० किमी आत घुसले नसते”. तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा पाहून या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा संताप व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या
मनसेने काढला वचपा! शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केला मनसेत प्रवेश
लग्नानंतर मिसेस चांदेकरांचा मेकओव्हर; फोटो पाहून तुमचाही बसणार नाही विश्वास
मनसेमधील आऊटगोईंग थांबेना! बड्या नेत्याने केला भाजपात प्रवेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.