निलेश राणेंची संजय राऊतांवर जोरदार टीका, म्हणाले, संज्या राऊतच थोबाड शेतकरी रंगवेल

मुंबई । कृषी कायद्याला विरोध करत काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. हे आंदोलक दिल्लीच्या सीमेवर पोहोचले आहेत. पोलिसांनी त्यांना मारहाण देखील केली आहे.
यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यास रोखले गेले आहे, असे वाटते कि ते या देशाचे नाहीत. त्यांना दहशतवाद्यांसारखे वागवले गेले आहे. ते शीख असल्यामुळे आणि पंजाब आणि हरियाणाहून आले आहेत, त्यांना खलिस्तानी म्हणतात.
मोदींनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. अशी टीका संजय राऊत यांनी त्यांच्यावर केली आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावरजोरदार टीका केली आहे.
संज्या राऊतला पंजाबच्या शेतकऱ्यांबद्दल बोलायचा अधिकार काय??? महाराष्ट्रात शेतकरी तडफडतोय, आत्महत्या करतोय त्याचं ठाकरे सरकारला काही नाही. संज्या राऊत चं थोबाड कधीतरी आपल्या राज्यातला शेतकरी रंगवेल तेव्हा लक्षात येईल ह्या हलकटांना की शेतकऱ्यांच्या विषयावर राजकारण करायचं नसतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 29, 2020
संज्या राऊतला पंजाबच्या शेतकऱ्यांबद्दल बोलायचा अधिकार काय? महाराष्ट्रात शेतकरी तडफडतोय, जीव देतोय त्याचं ठाकरे सरकारला काही नाही. संज्या राऊत चं थोबाड कधीतरी आपल्या राज्यातला शेतकरी रंगवेल तेव्हा लक्षात येईल ह्या हलकटांना की शेतकऱ्यांच्या विषयावर राजकारण करायचं नसतं. यावरून आता राजकारण पेटले आहे.
कृषी कायद्याला अनेक दिवसांपासून मोठा विरोध होत आहे. यामुळे विरोधक मोदींवर टीका करत आहेत. शिवसेना देखील भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र निलेश राणेंनी त्यांना जोरदार उत्तर दिले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.