..म्हणून ‘’अजित पवार पुन्हा नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’’, भाजपच्या नेत्याचा खुलासा

मुंबई | भाजपचे नेते नारायण राणे यांचा मुलगा आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारे वक्तव्य केले आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा नॉटरिचेबल होण्याची वेळ आली आहे असं म्हटले आहे.

राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यांचा संदर्भ देताना निलेश राणे यांनी ट्विट करत अजित पवार यांना टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नॉटरिचेबलच्या नाट्यमय घडलेल्या घटनेवर अचूक बोट ठेवले आहे.

निलेश राणे म्हणाले, ‘’अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली आहे”. असा खोचक टोला अजित पवार यांना लगावला आहे.

तसेच निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकार मधील तिसरा पक्ष काँग्रेसचे नाव घेत ‘’काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे’’. असं म्हटले आहे. भाजपा नेते निलेश राणे यांना काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळायला पाहिजे  तो त्यांचा अधिकार आहे असं का बोलत आहेत. असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
जय शिवराय! देवरूखात साकारले अवघे ३ सेंटिमीटरमध्ये शिवराय; विलासचा सर्वात लहान रांगोळीचा विश्वविक्रम
मोठी बातमी! नाना पटोले यांनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
टोल नाक्यावर गेल्यावर नुसता टोल भरू नका त्याचे फायदेही जाणून घ्या
कंगना पुन्हा बरळली; भारतीय क्रिकेटर्संना म्हणाली धोबी का कुत्ता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.