निलेश राणेंनी जयंत पाटलांवर जोरदार टीका, म्हणाले, पवार कुटुंबाचा लोमत्या अशीच तुमची ओळख

मुंबई । राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. ठाकरे सरकार केलेली कामे सांगत आहेत तर विरोधक सरकार अपयशी आहे म्हणून टीका करत आहे. यातच आता नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या हाती गाडीचे स्टेरींग आहे, राज्याचे नाही. महाराष्ट्राला ड्रायव्हर द्यायचा नव्हता, मुख्यमंत्री द्यायचा होता. मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर न पडणारे मुख्यमंत्री राज्याला मिळाले. राज्यावर मोठे कर्ज झाले आहे.

तसेच नारायण राणे हे गंजलेली तोफ आहे. त्याच्यामधून आलेल्या गोळ्यांना आम्ही आणि मातोश्रीही महत्त्व देत नाही, अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अकोल्यात बोलताना टीका केली होती.

जयंत पाटील यांनी केलेल्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी दिले आहे. इस्लामपूर मतदारसंघ मर्यादित नेते जयंत पाटीलाना स्वतःला सगळ समजतं असा गैरसमज आहे. गंजलेल्या तोफा दुरुस्त होतात पण गंजलेले विचार दुरुस्त होत नाही. पाटील साहेब इतिहासात तुमची नोंद ही पवार कुटुंबाचा लोमत्या अशीच होणार.

तुमचं काय काय गांजलेल आहे बोलायला लावू नका असा टोला लगावला आहे. यावरून आता शिवसेनेवर होणारी टीका राष्ट्रवादीवर होऊ लागली आहे. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.