“देशात स्वतःचा कचरा करुन घेतल्याबद्दल शिवसेनेचं अभिनंदन”

मुंबई | निवडणूक आयोगाने अखेर बिहार विधानसभा निवडणुच्या सर्व २४३ जागांचे निकाल जाहीर केले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाच एनडीएचे सरकार बनणार आहे. एनडीच्या खात्यात १२५ जागा जमा झाल्या आहेत. तर सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर असलेल्या महागठबंधनला ११० जागा मिळाल्या आहेत.

तसेच बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ५० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही. याचाच धागा पकडत आता भाजपाने नेते निलेश राणे यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

तसेच बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ५० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही. याचाच धागा पकडत आता भाजपाने नेते निलेश राणे यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

याबाबत ट्विट करत राणे म्हणतात, ‘शिवसेनेनं स्वत:चा कचरा करुन घेतला असून बिहारमध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेची परिस्थिती जशी झालीय तशीच परिस्थिती महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यामुळे होईल असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, ‘संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात राऊत करतील ही आम्हाला खात्री आहे,’ असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
संशोधनातून खुलासा; असा आवाज असणारे पुरुष धोकेबाज असतात, वाचा सविस्तर
सरपंचाने गावकऱ्यांना दिवाळीचे असे काही गिफ्ट दिले की गावकरी कधीही विसरणार नाहीत
‘आमचे ११९ उमेदवार विजयी, मात्र..’; तेजस्वींचा नितीश कुमारांवर गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.