‘राष्ट्रवादीवाले स्वतःला फार मोठे समजतात पण एक महिला किंवा पोलीसवाला त्यांची वाट लाऊन जातात’

मुंबई : राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून या सरकारमधील अनेक नेते सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत.

गेल्या काही महिन्यांपूर्वीच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, राजकारण होत असल्याचे कारण देत रेणू शर्मा या महिलेने आपली तक्रार मागे घेतली होती.

त्यानंतर राज्यात पूजा चव्हाण प्रकरण देखील चांगलेच गाजले. या प्रकरणात संबंध असल्याचे आरोप शिवसेना नेते व माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर करण्यात आले होते. भाजपने याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला.

दरम्यान, यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार शाब्दिक निशाणा साधला आहे. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले इतके विस्कटले आहेत की TV समोर येऊन तेच तेच बोलतायत,’ अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

‘त्या धनंजय मुंडे ला विचारा शेण खाऊन कसं सटकायचं. हे राष्ट्रवादीवाले स्वतःला फार मोठे समजतात पण ह्यांची वाट एक महिला नाही तर एक पोलिसवाले लावून जातात,’ अशा शब्दात निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लक्ष केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

अनिल देशमुखांना वाचवणारे शरद पवारांचे सगळे मुद्दे फडणवीसांनी पुराव्यानिशी खोडले; वाचा..

परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवर प्रतिक्रिया देण्यास नकार देणाऱ्या नवाब मलिक यांनी केला मोठा गौप्यस्फोट…

कृणाल पांड्याची पहील्याच सामन्यात ३१ चेंडूत ५८ धावांची धडाकेबाज खेळी; बापाच्या आठवणीत भर मैदानात रडला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.