“एका माणसाला वाचवण्यासाठी आणखी किती नागडे व्हाल, काय लाज उरली की नाही”

मुंबई | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘अजून किती नागडे होणार एका व्यक्तीला वाचवण्यासाठी. काय लाज उरली आहे की नाही. उघड सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे, विचार करा हे जर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर असं वागत असतील तर सामान्य माणसाची काय किंमत करतील? मराठी मीडिया बद्दल आश्चर्य वाटतं मला. असं ट्विट करत निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी यानंतर ‘सत्यमेव जयते’ असं ट्वीट केलं आहे. त्यांनी या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

त्यावर शरद पवारांनी पार्थ पवार यांना माध्यमांसमोर फटकारलं होतं. देशात सर्वात आधी पार्थ पवार यांनीच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली होती.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.