पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?; निलेश राणेंचा संतप्त सवाल

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता.
दिल्लीतील या हिंसाचाराचे पडसाद देखील मोठ्या प्रमाणात उमटले. ‘लाल किल्ल्यात हिंसक आंदोलकांनी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा एक भयानक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी ‘पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?’ असा सवाल केला आहे.
याबाबत ट्वीट करत निलेश राणे म्हणतात, ‘पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं? पोलिसांना पाहिजे तेव्हा त्यांनी जागा रिकामी केली असती. पण आजपर्यंत माणुसकी दाखवली. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं हे कुठलाही शेतकरी करू शकत नाही. या जमावाला कायदा बदलून हवा की कायदा बिघडवायचा आहे?,” असा सवाल निलेश राणे यांनी केला.
पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं?? पोलिसांना पाहिजे तेंव्हा त्यांनी जागा रिकामी केली असती पण आज पर्यंत माणुसकी दाखवली. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं, हे कुठलाही शेतकरी करू शकत नाही. या जमावाला कायदा बदलून हवा की कायदा बिघडवायचा आहे??? pic.twitter.com/GHGgK7XQ0C
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 27, 2021
दरम्यान, दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांनी मंगळवारी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते.
ट्रॅक्टर रॅलीदरम्यान ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. ठरवलेल्या मार्गावरुन न जाता शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी किल्ल्यात असणाऱ्या पोलिसांवर तलवारी उगारण्यात आल्या. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला.
महत्त्वाच्या बातम्या
बलात्का.राच्या आरोपानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आलेल्या मुंडेंचं जेसीबीवरुन फुलांची उधळण करत दणक्यात स्वागत
‘असा एकही दिवस जात नाही शीतल…’ लेकीच्या आठवणीत डॉ. विकास आमटे भावुक
‘ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझा विश्वासघात केला’
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.