खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ आहे; निलेश राणे पुन्हा राऊतांवर बरसले

मुंबई | सोमवारी शिवसेना प्रमुख संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतल्याचे स्पष्ट केलं. आणि या मुलाखतीमुळं देशाच्या राजकारणात खळबळ माजेल असंही ते म्हणाले.

भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांच्या याच वक्तव्यावर टीका केली आहे. “शरद पवारांच्या मुलाखतीमुळं कसलीही खळबळ माजनार नाहीये ही फक्त संजय राऊतांची वळवळ आहे. असं राणे म्हणाले आहेत.

संजय राऊतांनी शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. ही मुलाखत लवकरच शिवसेनेचे मुखपत्र समनातून प्रकाशित होणार आहे. स्वतः संजय राऊतांनी ट्विट करून ही माहिती दिली होती.

शरद पवार हे चीनपासून ते महाराष्ट्रपर्यंत सर्व गोष्टींवर बोलले आहेत. तेव्हा राऊत म्हणाले की, ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल.

यावर निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, “खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ आहे. देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत”.

“इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोकं चिडली आहेत, इंटरव्यू मध्ये इंटरेस्ट नाही कोणाला. खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही”. अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.