“संज्याने ठरवलं त्याची स्वतःची किंमत ही सव्वा रुपये आहे”

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर आरोप केल्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकार विरोधात भाजप असा संघर्ष बघायला मिळत आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊतांनी सामनाच्या माध्यमातून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती.

आज चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देत एक पत्र लिहिले आहे. तसेच संजय राऊतांवर आरोपही केले आहे. त्यानंतर आता संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया देत आपण चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयांचा दावा दाखल करणार आहे, असे म्हटले आहे.

आता संजय राऊतांच्या या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. संज्याने ठरवलं त्याची स्वत:ची किंमत सव्वा रुपये आहे, अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.

संज्यासारखा मूर्ख संज्याचं… आपण जेव्हा कोणावर नुकसानीचा दावा टाकतो तेव्हा आपल्या लायकी नुसार नुकसानाची किंमत ठरते. संज्याने ठरवलं त्याची स्वतःची किंमत ही सव्वा रुपये आहे. पहिल्यांदा संज्याने स्वतःची किंमत ओळखली, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी चंद्रकांत पाटील यांच्या पत्राला प्रतिक्रीया दिली आहे. त्यामध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र पाठवलं होतं. त्यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्याचा त्यांना पुर्ण अधिकार आहे. आम्ही त्यांचं उत्तर तसंच छापलं आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

तसेच पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटील जे काही बोललेत, त्यांनी जे आरोप केले आहे, ते मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाही. पाटलांनी जे म्हटलंय त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही, मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्याविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल; वाचा नेमकं काय आहे प्रकरण
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ लवकरच लग्नबंधनात अडकणार? सिद्धार्थने सांगितला प्लॅन
तृप्ती देसाईंचा बिग बॉसच्या घरात गौप्यस्फोट; म्हणाल्या आमच्या आंदोलनामुळेच इंदुरीकर महाराजांच्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.