‘नवाब मलिकांनी पाकिस्तानाच जावं, तिकडे टिपू सुलतान नावाचा रस्ता आहे’, निलेश राणेंची खोचक टीका

मुंबई गोवा महामार्गावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेलं आंदोलन आणि मुंबईतील क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून माजी खासदार निलेश राणे(Nilesh Rane) यांनी मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांच्यावर जोरदार टीका केली. रत्नागिरी जिल्हयात गुहागर येथे भाजप पक्षाचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.(nilesh-rane-criticise-minister-nawab-malik)

महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, “या महामार्गाच्या या महामार्गाच्या नावावर तुम्हाला घरंच चालवायचं असेल तर महामार्ग अर्धवटच राहणार. महाविकास आघाडीचे रास्ता रोको आंदोलन म्हणजे आपणच चोरी करायची आणि आपणच तक्रार दयायची अशातला भाग आहे”, अशी टीका देखील निलेश राणे यांनी केली.

“सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ता ९६ टक्के पूर्ण होऊ शकतो. रायगड जिल्ह्यात ७५ टक्के पुर्ण होऊ शकतो. मग रत्नागिरीत काय अडचण आहे? याला कारण रत्नागिरीत शिवसेनेची कर्मदरिद्री लोकं आहेत. यांच्याच ठेकेदारांमुळे महामार्ग रखडला”, असे देखील माजी खासदार नीलेश राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेत निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावरही टीका केली.

“नवाब मलिक हा या माणूस आहे? त्याने तिकडे पाकिस्तान मध्ये जावं….तिकडे टिपू सुलतान नावाचा रस्ता आहे”, असे म्हणत नीलेश राणे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर तोफ डागली. “नवाब मलिक हे कौशल्य विकास मंत्री असून त्यांनी त्यांच्या कौशल्याचा उपयोग जावयाला बाहेर काढण्यासाठी केला, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

“नवाब मलिक यांच्या मतदारसंघात एकदा जाऊन बघा. साधा ट्रकही जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती त्यांच्या मतदारसंघात आहे. इकडे संजय राऊत व तिकडे नवाब मलीक यांना काहितरी असेच बोलण्याचे काम दिले आहे. विकासात्मक चर्चा काही नाही. महाराष्ट्रातील विषय बाजुला ठेऊन काहितरी रोज नवीन टूम काढतात व बोलतात”, असे माजी खासदार निलेश राणे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, “महाराष्ट्रातील मुख्य विषय बाजुला ठेवून या सरकारला नको त्या चर्चेतच महाराष्ट्र ठेवायचा आहे. राज्यात महाविकास आघाडीच सरकार येणे, हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे.” माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या टीकेवर राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
१३ वर्षांनंतर निवृत्त झाला विराट, नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनीही मारली त्याला मिठी
हा तर संगतीचा परिणाम, कोंबड्यांसोबत राहून कुत्रा भुंकायचं सोडून देऊ लागला बांग, पहा व्हिडीओ
प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींनी ख्रिस गेल आणि जॉन्टी रोड्स यांना लिहिले खास पत्र; सांगितल्या ‘या’ गोष्टी..