‘भाषा सांभाळून वापर नाहीतर फटके देऊ’; भाजप नेत्याची सेनेच्या बड्या मंत्र्यांला थेट धमकी

मुंबई | वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या कुटुंबानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना जमीन विकल्याची कागदपत्रं दाखवून व्यवहाराच्या चौकशीची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना केली आहे.

याचाच धागा पकडत राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना, ‘ दिवाळीनंतर शिवसेना त्यांच्यावर कोणते आरोप करते ते पाहाच आणि तेव्हा किरीट सोमय्या यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देण्यास तयार राहावे,’ असा इशारा दिला होता.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देतं परब यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे. ‘दिवस गेले ते अनिल परब.. सगळ्यांना आता शिवसेना कळली आणि शिवसेनेची फुसकी स्टाईल पण कळली. किरीट सोमय्याजिने केलेल्या आरोपांचे उत्तर द्या,’ असे निलेश राणे यनी म्हंटले आहे.

तसेच ‘एकही व्यवसाय नसताना सगळे व्यवहार केले कसे?? पैसे आले कुठून?? भाषा संभळून वापर परब नाहीतर उलटे फटके पडतील,’ असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

दरम्यान, सोमय्या यांनी जमीन व्यवहाराची कागदपत्रेही ट्विट करत‘ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार. गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत आहेत,” असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
‘बेताल आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार’
अमोल कोल्हेंनी बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेतल्याने लोकं संतापली; सोशल मिडीयावर तुफान ट्रोलींग
‘बाई आज तुमची खूप उणीव भासतेय’, आईच्या आठवनीत शरद पवार व्याकूळ; पहा काय म्हणताहेत

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.