”अब्दूल सत्तार तुझ्यासारखे लोकं आमची गाडी धुवायला असतात, औकातीत रहा”

मुंबई | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडल्या जाणाऱ्या सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक आता रंगात आली आहे. अशातच आता आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.

‘निलेश राणे चार आणे, तर त्याचा बाप किती आणे हे मला माहित नाही,’ असे म्हणत शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपा नेते निलेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.

याचाच धागा पकडत निलेश राणे यांनी सत्तार यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘डुक्कर सत्तार अब्दुल, कॅबिनेट मंत्रिपदासाठी काँग्रेसमधून झाला गुल, शिवसेनेने राज्यमंत्री देऊन केला एप्रिल फुल,’ असे ट्विट राणे यांनी केले आहे.

पुढे ते म्हणाले, ‘अब्दुल तुझी लायकी किती आणि तू बोलतो किती. राणे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी नाही. तुझ्यासारखे आमची गाडी धुतात. अवकादित रहा,’ अशा शब्दात त्यांनी सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
विद्या बालनने भाजप मंत्र्याच्या ‘त्या’ ऑफरला नकार दिल्याने दादागारी करत शुटींग पाडले बंद
मनोजकुमारने डिंपलला रात्री १२ वाजता फोन करून हाॅटेलवर बोलावले व दिली ही ऑफर
आधी देश मग कुटुंब; वडिलांच्या निधनानंतरही सिराज मोहम्मद थांबणार ऑस्ट्रेलियातच

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.