मानलं आमदारसाहेब! दिवसरात्र रुग्णसेवेसाठी ‘हा’ आमदार कोविड सेंटरमध्येच झोपतोय

सध्या देशात कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. अशातच ऑक्सिजनचा साठा, रेमेडीसीवर इंजेकशन्सचा तुटवडा आणि अपुरी आरोग्य सुविधा यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

राज्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत असणारे आमदार झालेले आहेत. आमदार निलेश लंके यांनी १,१०० बेडचे अद्यावत कोविड सेंटर खोलले आहे.

रुग्णांची काळजी घेण्यासाठी कोरोनासारख्या महामारीत ते स्वतः रुग्णांना आधार देत आहेत. रुग्णांच्या सेवेसाठी ते कोविड सेंटर मध्येच मुक्काम करतात. रुग्णांचा ऑक्सिजन देखील ते स्वतःच तपासात असतात. रुग्णांची आस्थेनं विचारपूस करून त्यांची काळजी घेण्याचे काम ते याठिकाणी करत आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी जे काही जेवायला असते तेच जेवण निलेश लंके देखील तिथेच करतात. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे . यात ते कोविड सेंटरमध्येच जमिनीवर झोपलेल्याचं दिसून येत आहे . आपल्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत : लोकांसाठी झटत आहे .

कोविड सेंटरमध्ये रुग्णांना सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, शिरा, पोहे तर दुपारच्या जेवणामध्ये मांसाहार, पालेभाज्या तसेच यांच्यासह फळे ते पाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी देण्यात येतं . जिल्हाभरातून हजारो रुग्ण सेंटरमध्ये दाखल झाले असून दररोज शंभराच्यावर पेशंट बरे होऊन घरी गेले आहेत .

” आपलं काय व्हायचं ते होऊ द्या, जर मी घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. माझी लोकं सुरक्षित असली पाहिजेत , ” असं म्हणत लंके हे दिवसरात्र कोरोनाबाधितांच्या सेवेत झटत आहेत . लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असून तो त्यांचा कुटुंबप्रमुखही असतो, अशी भावना लंके यांनी व्यक्त केली होती .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.