१५ दिवसात १ कोटी ५ हजार देत माफी मागा, नाहीतर…; निलेश लंकेंनी मनसे पदाधिकाऱ्याला दिला इशारा

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमधील भाळवणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र पवार यांच्या नावे कोविड सेंटर सुरू केले आहे. . त्यांनी चालू केलेले कोविड सेंटर महाराष्ट्रसह देशात चर्चेचा विषय ठरले आहे. आमदार निलेश लंके यांचे काम कौतुकास पात्र असेच आहे.

मात्र काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे निलेश लंके यांच्याबद्दल चर्चा रंगू लागली आहे. पारनेरचे मनसे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आमदार निलेश लंकेंवर गंभीर आरोप केले होते.

व्हिडिओमध्ये आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरबाबत धक्कादायक आरोप केले होते. तसेच निलेश यांनी मला शिवीगाळ केली आहे. लंके यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. असं मनसे पदाधिकारी पवार म्हणाले होते.

यानंतर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके चांगलेच आक्रमक झाले आहेत. अविनाश पवार यांनी बदनामी केली आहे. यामुळे निलेश लंकेंनी  मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांना नोटीस पाठवली आहे.

१५ दिवसात १ कोटी ५ हजार देत माफी मागा नाहीतर फौजदारी गुन्हा दाखल करू असं नोटीसीमध्ये म्हटलं आहे. वकिल म्हणाले, मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांनी सोशल मिडियावर निलेश लंकेंची बदनामी केली आहे. यामुळे पवार यांना १ कोटीची अब्रूनुकसानीची नोटीस देण्यात आली आहे.

नोटीस मिळाल्यानंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन भूतारे म्हणाले, स्वत:ला फकीर म्हणून घेणाऱ्या लंके यांनी १ कोटींचा दावा ठोकला कसा? कोरोनाच्या काळातील निलेश लंके यांचे काम कौतूकास्पद आहे.

मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यावर दबाव टाकणे मनसे कदापी खपवून घेणार नाही. मनसे अविनाश पवार यांच्या पाठीशी आहे. असं भूतारे यांनी म्हटलं आहे. अविनाश पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले की, माझा व्हिडिओ राज ठाकरेंपर्यंत पाठवा. साहेबांना सांगा तुमचा मनसैनिक खचला आहे.
महत्वाच्या बातम्या-
सुनेवर थुंकल्याचा शिवसेना नेत्याचा व्हिडीओ, भाजपने घरगुती वादाचा फायदा घेऊ नये; सेना नेत्याची विनंती
दुकानाबेहर लिहिले, शटर बंद असेल तर कॉल करा, आम्ही आत्म्याप्रमाणे इथे भटकत आहोत; पोलिसांनी दिले असे उत्तर
नकली आयकार्ड बनवून अभिनेत्रीने घेतली कोरोना लस; धक्कादायक माहिती आली समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.