यापुढे किर्तनकार पद लाऊ नका! बिग बाॅसमध्ये गेल्याने शिवलीला पाटलांवर महाराज मंडळी भडकली

बिग बॉस मराठीचा यंदाचा तिसरा सिजन पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक आतूर झाले होते. कारण १९ सप्टेंबरपासून सरु होणाऱ्या बिग बॉसमध्ये कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील या देखील बघायला मिळणार आहे.

आता सोशल मीडियावर शिवलीला बाळासाहेब पाटील यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. कोणी त्यांना बिग बॉसमध्ये बघण्यासाठी उत्सुक आहे, तर कोणी ते कीर्तनकार असल्यामुळे त्यांनी बिग बॉसमध्ये जाणं योग्य नाही, असे म्हटले आहे.

आता एक युवा कीर्तनकार म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते. अशा शिवलीला पाटील यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर वारकरी सांप्रदयाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. वारकरी सांप्रदायातील महाराज ह.भ.प. निलेश भैय्या झरकर यांनी शिवलीला यांच्यावर टीका केली आहे.

शिवलीला यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे कि, कीर्तनकार म्हणून बिग बॉसच्या घरात मिरवायचा नैतीक अधिकार शिवलीला ताईंना नाही. यापुढे त्यांनी कीर्तनकार हे पद कुठेही लावू नये, असे निलेश झरकर यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांच्या खाजगी आयुष्यात त्यांनी काय करावे काय करू नये ह्याच्या बाबतीत आम्हाला काही देणेघेणे नाही. पण त्यांनी कीर्तनकार हे पद लावले तर मी कायदेशीर लेखी तक्रार पोलिस आयुक्तांच्याकडे करणार आहे, असा इशाराच निलेश झरकर यांनी दिला आहे.

शिवलीला पाटील या एक कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी भक्तिमय वातावरणातच बिग बॉसच्या घरात एंट्री केली . पण त्यांची हि एंट्री वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. झरकर यांनी पोलिसात तक्रार करण्याचा उल्लेख केल्याने आता बिग बॉस मराठीची टीम याबाबत काय निर्णय घेणार हे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘जैवलिन – एक प्रेम कथा’ ‘गोल्डन बॉय’ची जाहिरात क्षेत्रात दमदार एंन्ट्री..
“कोरोना काळात संघाच्या स्वयंसेवकांनी केलेली निस्वार्थ सेवा म्हणजे हिंदुत्व”
“शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याची नार्को टेस्ट करा, त्यातून फक्त एकच गोष्ट समोर येईल ती म्हणजे…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.