Share

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ प्रकरणी अजित पवार यांचा खुलासा, म्हणाले, “मोदी आलेले तेव्हा आम्ही तिघं बसलेलो, घायवळचा विषय निघाल्यावर फडणवीसांनी…”

Nilesh Ghaywal : पुणे पुण्यातील गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निलेश घायवळ प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवण्याच्या प्रकरणात आधीच निलेश घायवळ अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर आणखी एक वाद निर्माण झाला आहे. त्याचा भाऊ सचिन घायवळ (Sachin Ghaywal) याला शस्त्र परवाना देण्याच्या शिफारशीवरून.

राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी सचिन घायवळ याच्या परवान्यासाठी शिफारस केली होती. मात्र, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी ती नाकारली. या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतः याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांची भूमिका

अजित पवार म्हणाले, “निलेश घायवळ प्रकरणी मी स्वतः पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, कोणत्याही पक्षाचा माणूस असो किंवा प्रभावशाली असो, जर त्याने कायदा हातात घेतला, तर त्याच्यावर रीतसर कारवाई व्हायलाच हवी.”

ते पुढे म्हणाले, “गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळ यांच्या बंदुकीच्या परवान्यासाठी शिफारस केली होती. पण पोलीस आयुक्तांनी नियमांनुसार निर्णय घेतला आणि परवाना दिला नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे आणि त्यात कुणाचाही हस्तक्षेप मला मान्य नाही.”

मोदींसमोर फडणवीस-शिंदे- पवार बैठक

अजित पवार यांनी पुढे उघड केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्याच्या वेळी मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तिघेही एकत्र बसलो होतो. त्यावेळीही निलेश घायवळ प्रकरणाचा उल्लेख झाला. त्या वेळी फडणवीस यांनीही ठाम भूमिका घेतली की, कायद्याच्या चौकटीतच कारवाई व्हावी, कुणाचंही ऐकायचं नाही.”

कायद्याच्या चौकटीत कारवाईच

पवार यांनी स्पष्ट केलं की, “राज्यात कुणीही कायदा हातात घेतला, तर तो कुणाच्याही प्रभावाखाली सुटणार नाही. पोलिसांनी नियमांप्रमाणे कारवाई करावी, हीच आमची भूमिका आहे.”

 

 

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now