साकीनाका रेप केस: निलम गोऱ्हे थेट वर्षावर दाखल; मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला

कोरोनाच्या पार्श्भूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. निर्बंध कमी झाल्यावरही महिलांच्या अत्याचारांचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. असे प्रकार घडू नये यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिला सुरक्षिततेबाबत काम करणाऱ्या सामाजिक संघटना यांच्या अनेक बैठकी घेऊन अनुभवांच्या आधारे विधायक सूचना व निर्देश दिले होते.

राज्यात होणाऱ्या महिलांचे शोषण थांबवून त्यांच्या सुरक्षिततेबाबत महत्वाच्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश द्यावेत अशी विनंती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबईतील लोकल मधील महिलांना होणाऱ्या त्रास बाबत सीसीटीव्ही संख्या, गस्ती वाढविणे, टोल फ्री क्रमांकाचा वापर करणे. अशा सूचना दिल्या होत्या. या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी साठी महिलांच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे, सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊन सूचना घ्याव्यात. पुणे, ठाणे, सातारा, येथील रेल्वेच्या हद्दीत झालेल्या विविध घटनांमुळे याची आवश्यकता जाणवते.

प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती स्थापन करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्या सर्व पुनर्गठीत केल्या असून त्या महिलांना कामाचे स्वरूप, समितीचे अधिकार व कर्तव्ये समजावीत म्हणून प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. याबाबत पोलीस प्रशासनास आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात.

पॉक्सो कायद्यांतर्गत प्रलंबित केसेस तत्काळ निकाली काढण्यासाठी फिरती फास्ट्ट्रक न्यायालये व फिरती न्यायालये कार्यान्वित करण्यात यावीत. पॅरोल व सुटलेल्या पॉक्सोच्या गुन्हेगारांबाबत आढावा घेण्यात यावा. शक्ती कायदा पारित होईपर्यंत त्यामधील तरतुदी प्रमाणेच सर्व पोलीस यंत्रणांनी, प्रचलित कायद्यानुसार तत्काळ अंमलबजावणी करावी असे निर्देश द्यावेत.

महिलांवरील अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक ठेवणे आवश्यक असून त्यासाठी वरील महत्वाच्या निर्णय घेऊन संबंधित विभागास आवश्यक निर्देश आपण द्यावेत अशा प्रकारचे निवेदन नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिले.

 

महत्वाच्या बातम्या
ऑगस्टमध्ये दडी सप्टेंबरमध्ये मुसंडी! ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

सूनेने केली सासूला जबर मारहाण, मुलगा बघतच राहीला; सूनेच्या या घाणेरड्या कृत्यावर नेटकरी संतापले
मोठी बातमी! भारतीय रेल्वेत मोठे बदल होणार, खाजगी कंपन्या भाड्याने घेणार रेल्वे
“एवढ्या रात्री ती काय करत होती? तिचे कपडे चुकले असतील! सगळं तिचंच चुकलं असणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.